Join us

नोरा फतेहीचा बिकनीमधील व्हिडीओने सोशल मीडियावर लावली आग, दिसतेय ग्लॅमरस लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 15:37 IST

नोरा सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते.

बॉलिवूडची डान्स क्वीन नोरा फेतहीने पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. नोरा सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. ती नेहमीच आपल्या डान्सने आणि फोटोंमुळे आकर्षणाचं केंद्रबिंदू असते. सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोईंगही मोठी आहे. नोरा फतेहीचा एक व्हिडिओ सध्या खूप वेगवान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत नोराचा ग्लॅमरस लूक दिसतो आहे. हा व्हिडिओ नोराने तिच्या सेल्फी कॅमेर्‍याने शूट केला आहे. यात ती बिकिनीमध्ये दिसतेय. चाहत्यांना तो खूप आवडला अहे.  

या व्हिडिओमध्ये नोरा बीचवर आहे. समुद्राच्या लाटा येता-जाताना दिसतायेत. नोराने एका हाताने हा व्हिडिओ रेकॉर्ड करित आहे, आणि दुसरा हात तिच्या डोक्यावर ठेवला आहे. नोराच्या या  व्हिडीओला प्रचंड पसंती मिळत आहे.

नोरा फतेहीने जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते सिनेमात दिलबर हे आयटम साँग करून बॉलिवुडमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने डांस शोमध्येही भाग घेतला होता. याशिवाय ‘स्त्री’ सिनेमातील ‘कमरिया’ आणि जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’ सिनेमात ‘ओ साकी साकी’ या हिट गाण्यांमध्ये तिने रसिकांची मनं जिंकली होती. 

टॅग्स :नोरा फतेही