Nora Fatehi Files Defamation: नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील कायदेशीर वाद वाढत आहे. नोरा फतेही(Nora Fatehi)ने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) विरोधात सोमवारी दिल्ली न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. नोरा म्हणते की, जॅकलिन आणि सुकेशसह 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिचे नाव चुकीच्या पद्धतीने ओढण्यात आले. नोराने या तक्रारीत 15 मीडिया संस्थांची नावेही दिली आहेत. जॅकलिन फर्नांडिस विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर यावर आता जॅकलिन फर्नांडिसचे वकील प्रशांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोघी मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या निशाण्यावर आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने दोन्ही अभिनेत्रींची अनेकदा चौकशी केली आहे. नोराच्या आरोपानंतर जॅकलिनच्या वकिलाने या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की त्याच्या क्लायंटने सार्वजनिकपणे नोराबद्दल कधीही काहीही सांगितले नाही, त्यामुळे मानहानीचा कोणताही खटला होऊ शकत नाही.
एका मुलाखतीदरम्यान प्रशांत पाटील म्हणाले, 'जॅकलिनने नोरा किंवा इतर कोणत्याही व्यक्तीविरोधात कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियासमोर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. ईडीने केलेल्या कारवाईबाबत बोलण्यास तिने जाणीवपूर्वक नकार दिला आहे. आजपर्यंत तिने कायद्याची मर्यादा जपली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तिने काहीही बोलण्याचं टाळलं आहे.
जॅकलिनच्या वकिलाने पुढे सांगितले की, “नोराने दाखल केलेल्या दाव्याबाबत आम्हाला अद्याप अधिकृतपणे काहीही मिळालेले नाही. मा.न्यायालयाचा आदेश आम्हांला मिळाल्यावर आम्ही त्याला कायदेशीर उत्तर देऊ.