हिला फूल बॉडी मास्क बंधनकारक करा...! नोरा फतेहीचा रिव्हिलिंग ड्रेस पाहून युजरचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 16:18 IST
सध्या नोरा फतेहीचा (Nora fatehi ) एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि या व्हिडीओमुळे नोरा जबरदस्त ट्रोलही होतेय.
हिला फूल बॉडी मास्क बंधनकारक करा...! नोरा फतेहीचा रिव्हिलिंग ड्रेस पाहून युजरचा संताप
ठळक मुद्देनोरा फतेही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. नोराने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
सध्या नोरा फतेहीचा (Nora fatehi ) एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि या व्हिडीओमुळे नोरा जबरदस्त ट्रोलही होतेय. हा व्हिडीओ आहे एअरपोर्टवरचा. होय, नोरा मुंबई एअरपोर्टवर दिसली आणि सगळे कॅमेरे तिच्यावर खिळले. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून लोक खवळलेत. (Nora fatehi spotted at airport) व्हिडीओतील नोराचा रिव्हिलिंग ड्रेस पाहून लोकांना पारा चढला.
दिशा पाटनी व नोरा फतेहीमध्ये स्पर्धा सुरु आहे काय? असे एका युजरने नोराचा व्हिडीओ पाहून लिहिले. एकाने तर नोराचा हा ड्रेस पाहून संतप्त प्रतिक्रिया दिली. यांना फूल बॉडी मास्क बंधनकारक करावा, असे या युजरने लिहिले. एअरपोर्टवर इतके असे कपडे घालून मिरवता, थोडी तर लाज बाळगा, अशा शब्दांत एका युजरने नोराला ट्रोल केले.
नोरा फतेही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. नोराने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी नोराला खूप संघर्ष करावा लागला. कधी वेटरचे काम करून तर लॉटरी विकून तिने अनेक दिवस काढले़ सुरूवातीला तिला हिंदी बोलता येत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ऑडिशन दरम्यान हिंदी येत नसल्याने तिची खिल्ली उडवली गेली होती. ‘बिग बॉस 9’ मध्ये सहभागी झाल्यानंतर नोराचे नशीब बदलले. नोरा फतेहीने करिअरची सुरूवात हिंदी चित्रपट रोर - टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती. नोरा मॉडेल आणि अभिनेत्रीशिवाय एक उत्तम बेली डान्सर आहे. साकी साकी, दिलबर आणि कमरिया या आयटम सॉन्गने नोराला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर 26.4 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.