गेल्या काही दिवसांमध्ये नोरा फतेहीने आपली बऱ्यापैकी ओळख तयार केली आहे. 'सत्यमेव जयते'मधील 'दिलबर'गाणं हीट झाल्यानंतर नोरा हे नाव आता घराघरात पोहोचले आहे. सध्या ती बाटला हाऊसमधील आयटम नंबर 'साकी-साकी'ला घेऊन चर्चेत आहे. 'रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन' या सिनेमातून डेब्यू केलेल्या नोराने साऊथनमधील अनेक सिनेमातील गाण्यावर परफॉर्म केले आहे. मात्र नुराचा इथंपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, नोराने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, करिअरच्या सुरुवातीला स्ट्रलिंगच्या काळात तिच्यासोबत लोक कसा व्यवहार करायचे ते. ऑडिशनच्या दिवसांना उजाळा देताना नोरा म्हणाली कास्टिंग एजेंट्स माझ्यासोबत चांगली वर्तवणूक करायचे नाहीत आणि माझ्या तोंडावर ते माझी खिल्ली उडवायचे.
नोरा पुढे म्हणाली, तेव्हा मी हिंदी शिकायला सुरुवात केली होती पण माझी मानसिक तयारी यासाठी झाली नव्हती. तिच्यासमोर लोक खिल्ली उडावयाचे म्हणून ती रस्त्यात घरी रडत जायची. एका कास्टिंग एजेंटने तर नोराला तिच्या देशात परत जाण्यासाठी सांगितले होते. नोरा म्हणाली ही गोष्ट मी कधीच विसरु शकत नाही.
नोरा फतेहीला आयटम नंबरसाठी ओळखले जाते, तिला ही प्रेक्षकांमधील इमेज बदलायची असून याबद्दल ती म्हणते की, एक प्रोजेक्ट इमेज बदलू शकत नाही. माझ्याकडे यावर्षी काही प्रोजेक्ट आहेत ज्यात मी रसिकांना डान्स व म्युझिकपेक्षा वेगळे काहीतरी करताना दिसणार आहे.