बॉलिवूडची डान्स क्वीन नोरा फेतही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. नोरा सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. ती नेहमीच आपल्या डान्सने आणि फोटोंमुळे आकर्षणाचं केंद्रबिंदू असते. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोईंगही मोठी आहे. ती तिच्या व्हेकेशनचे फोटो, डान्स व्हिडीओ आणि म्युझिक व्हिडीओ फॅन्ससाठी शेअर करत असते. नोरा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे ते तिच्या कॅज्युअल स्टाईलमुळे.
नोरा फतेहीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिने ती डार्क ऑरेंज रंगाच्या ब्लेझरसह गोल्डन पँटमध्ये परिधान केली आहे. दुसरीकडे, ब्लॅक पम्प्स आणि ब्लॅक हँडबॅगमुळे तिचा लुक अधिक आकर्षक दिसतो आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार नोराने घातलेला ब्लेझरची किंमत १६९४ डॉलर्स म्हणजेच १.२ लाख रुपये इतकी आहे. यासह, त्याच्या हातात काळ्या रंगाचा पर्स देखील दिसतेय, ही बॅग सेंट लॉरेंट कंपनीची आहे, ज्याची किंमत २०५०डॉलर्स म्हणजेच १.५ लाख रुपये आहे. एकंदरीत केवळ ब्लेझर आणि पर्सची किंमत मिळून २.७ लाख रुपये आहे. या किंमतीत, एक कपल आरामात मालदीवची ट्रिप होऊ शकते.
नोरा फतेहीने जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते सिनेमात दिलबर हे आयटम साँग करून बॉलिवुडमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने डांस शोमध्येही भाग घेतला होता.