Join us

हुक्काबारमध्ये काम करायची 'ही' अभिनेत्री; मानसिक स्वास्थ्यासाठी घ्यावा लागलेला थेरपीचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 14:18 IST

Bollywood actress: तिने 2014  मध्ये 'रोर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स' या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करणं वाटतं तितकं सोपं नाही. या इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष स्ट्रगल केल्यानंतर या क्षेत्रात त्यांचं स्थान निर्माण केलं आहे. यात एका अशा अभिनेत्रीची चर्चा रंगलीये जी फक्त ५ हजार रुपये घेऊन भारतात आली होती. या अभिनेत्रीने सुरुवातीच्या काळात इतका स्ट्रगल केला की तिला अक्षरश: एक अंड आणि पाव खाऊन दिवस काढावे लागले.

सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीये ती अभिनेत्री नोरा फतेही (Nora fatehi) हिची. नोराने तिच्या करिअरमध्ये बराच स्ट्रगल केला. एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या संघर्ष काळावर भाष्य केलं. विशेष म्हणजे त्या काळात तिने इतका त्रास सहन केला की आजही त्या आठवणी आल्या की तिच्या डोळ्यात पाणी येतं.

 5 हजार घेऊन आली भारतात

नोराने 'माशेबल इंडिया ऑफ द बॉम्बे जर्नीमध्ये तिची स्ट्रगल स्टोरी सांगितली. ज्यावेळी ती भारतात आली त्यावेळी तिच्याकडे फक्त 5 हजार रुपयेच होते. इथे आल्यानंतर ती 9 मुलींसोबत एका 3 BHK फ्लॅटमध्ये राहत होती.

झाला मानसिक त्रास

सुरुवातीला नोराने एका एजन्सीमध्ये काम केलं. या एजन्सीमध्ये तिला कमी पगारात काम करावं लागत होतं. मात्र, या काळात तिला बराच मानसिक त्रास झाला. ती कंपनी नोराच्या घराचं भाडं भरायचे पण तिच्याकडून कमिशन सुद्धा घ्यायचे. या काळात मी इतकी त्रासले होते की मला मानसिक स्वास्थ्यासाठी थेरपीचा आधार घ्यावा लागला.

अंडी आणि ब्रेड खाऊन काढले दिवस

त्याकाळात पैशांची इतकी गरज असायची की ती एक-एक रुपया जपून वापरायची. त्यावेळी ती एक अंड, ब्रेड आणि एक ग्लास दूध पिऊन दिवस काढायची. नोराने हुक्का बारमध्येही काम केलं आहे. या काळात ती बऱ्याचदा स्वत: ला एका खोलीत कोंडून घ्यायची आणि त्या काळात भाषा शिकायची.

दरम्यान, नोराने 2014  मध्ये 'रोर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स' या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं.  त्यानंतर तिने अनेक बॉलिवूडपटांमध्ये आयटम डान्स केला आहे.

टॅग्स :बॉलिवूडनोरा फतेहीसेलिब्रिटीसिनेमा