आपल्या डान्सच्या माध्यमातून नोरा फतेहीने रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. सत्यमेव जयतेमधील 'दिलबर' गाण्यामुळे घराघरात पोहोचली आहे. नोरा पॅरिसमधील ओलंपिया स्टेडियममध्ये परफॉर्मन्स सादर करणार आहे. ओलंपिया स्टेडियममध्ये आपली कला सादर करणारी नोरा पहिली भारतीय आहे. याआधी मडोना, द बीटल्स, जेनेट जॅक्सन, पिंक फ्लोयड जगभरातील या प्रतिष्ठित कलाकारांनी याठिकाणी आपली कला सादर केली आहे. याशिवाय अनेक हॉलिवूडच्या कलाकारांनी देखील आजवर इथं परफॉर्म केले आहे. नोरा एकमेव बॉलिवूडच्या अभिनेत्री आहे जिला ही संधी मिळाली आहे.
'पॅरिस'मध्ये परफॉर्म करणार नोरा फतेही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 17:38 IST