Join us

नोरा फतेहीच्या वाढदिवशी फुलले गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य; चाहत्यांनी दिलं भारी गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 14:15 IST

नोराचा समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग असतोच. शिवाय तिचे चाहते नोराचे विचार पुढे घेऊन जाताना दिसून येतात. 

'दिलबर गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते. तिची प्रत्येक अदा रसिकांना घायाळ करणारी असते.  सौंदर्य, अदा आणि उत्तम अभिनयाचा अनोखा मेळ नोरामध्ये दिसतो. नोराने आजवर विविध भूमिकांमधून आणि डान्समधून रसिकांची मनं जिंकली आहेत. नोराचा समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग असतोच. शिवाय तिचे चाहते नोराचे विचार पुढे घेऊन जाताना दिसून येतात. 

नुकतेच नोरानं ६ फेब्रुवारी आपला वाढदिवस साजरा केला. नोराच्या चाहत्यांनी  तिचा वाढदिवस सामाजिक कार्य करून साजरा करायचं ठरवलंय. म्हणूनच त्यांनी गरजू मुलांच्या आयुष्यात आनंद फुलवण्यासाठी अन्नदान केलं. याचा व्हिडीओ नोरापर्यंत पोहचल्यानंतर ती भावूक झाली. तिनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. व्हिडीओमध्ये लहान चिमुकले नोराला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. 

नोरानं यावर प्रतिक्रिया देताना म्हणाली, माझा आजपर्यंतचा सर्वोत्तम वाढदिवस आणि हे त्याचं सर्वात मोठे कारण आहे. दरवर्षी माझे चाहते मला दाखवून देतात की त्यांचे अंतःकरणे किती दयाळू आणि सुंदर आहे. किती भारी हे गिफ्ट आहे.  मी खूप भाग्यवान व्यक्ती आहे. जिच्याकडे इतके सुंदर लोक आहेत, ज्यांच्यावर मी जेवढं प्रेम करते तितकेच प्रेम तेही माझ्यावर करतात. या खास गिफ्टबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्या डोळ्यात अश्रू आणले. कधीही बदलू नका. कायम दयाळू आणि प्रेमळ राहा.  प्रत्येकाची काळजी घ्या! तुम्ही सगळ्यात बेस्ट चाहते आहात'.

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच विद्युत जामवाल, एमी जॅकसन, अर्जुन रामपाल, जॅकलिन फर्नांडिस यांच्यासह 'क्रॅक' सिनेमात दिसणार आहे. नोराचा हा सिनेमा येत्या २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. नोरानं वरूण धवन, श्रद्धा कपूर, नेहा कक्कड, जॉन अब्राहम आणि सलमान खान या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.  तसेच  नोराने अनेक टी- सीरिजच्या गाण्यांमध्ये काम केलं. 

टॅग्स :नोरा फतेहीसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा