Join us

भररस्त्यात गर्दीच्या घोळक्यात नोरा फतेही करत होती डान्स, लाजिरवाणे क्षण कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 1:39 PM

नोरा फतेहीचे (Nora Fatehi) नवीन गाणे 'डान्स मेरी रानी' रिलीज झाले आहे. हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पण हे गाणे चर्चेत येताच नोराचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,

बॉलिवूड अभिनेत्री डान्सर नोरा फतेहीने (Nora Fatehi)  सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. नोराचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. सोशल मीडियावर सक्रीय असलेली नोरा आपले फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससह शेअर करत असते. ती आपल्या फॅन्सना कधीही निराश करत नाही. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते.तसेच खास व्हिडीओही तिचे सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तिचा प्रत्येक फोटो व्हिडीओ तिच्या फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात. नोरा फतेही तिच्या एका व्हिडिओ चर्चेत आली आहे. ती जेव्हा जेव्हा ती डान्स करते तिच्या प्रत्येक मुव्हजवर चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असतात. तिला पाहताच चाहतेही तिच्याकडे डान्स  करण्याची मागणी करू लागतात. पण अलीकडे असे करणे नोराला चांगलेच महागात पडले आहे. कारण पब्लिकमध्ये डान्स करताना ती Oops Moment ची बळी पडली आहे.

नोरा फतेहीचे नवीन गाणे 'डान्स मेरी रानी' रिलीज झाले आहे. हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पण हे गाणे चर्चेत येताच नोराचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिला डान्स करताना Oops Moment ला सामोरे जावे लागले. या व्हिडिओमध्ये नोरा फतेही निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. 

व्हिडिओमध्ये नोराच्या अवतीभोवती मोठी गर्दी जमल्याचे पाहायला मिळतंय. सगळं काही विसरत नोराही मस्त डान्स करताना दिसत आहे. पण अचानक, डान्स मुव्हज करताना तिचा शॉर्ट स्लिट ड्रेस उडतो आणि अंडरगारमेंट्स दिसतात. लगेच नोराच्याही ही गोष्ट लक्षात येते आणि अस्वस्थ झालेली नोरा ड्रेस सावरते आणि एका बाजूला उभी राहते. शॉर्ट ड्रेसने नोराला दगा दिल्यामुळे नको त्या परिस्थितीला नोरा सामोरे जावे लागले.

टॅग्स :नोरा फतेही