Join us

आमिर खान नाही तर या सुपरस्टारची फॅन आहे किरण राव, जाणून घ्या कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 17:27 IST

Kiran Rao : निर्माती-दिग्दर्शिका किरण राव आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. किरणने 'जाने तू या जाने ना', 'पीपली लाइफ', 'डेल्ही बेली', 'तलाश', 'दंगल', 'लापता लेडीज' यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.

निर्माती-दिग्दर्शिका किरण राव (Kiran Rao) आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. किरणने 'जाने तू या जाने ना', 'पीपली लाइफ', 'डेल्ही बेली', 'तलाश', 'दंगल', 'लापता लेडीज' यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. किरण रावसाठी हे वर्ष खूप खास आहे. तिच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'लापता लेडीज' या चित्रपटाने भारताकडून यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी अधिकृत प्रवेश केला आहे. किरण रावने आमिर खान(Aamir Khan)सोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आमिर खान तिचा आवडता अभिनेता नाही.

किरण रावने काही वर्षांपूर्वी इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आमिर खान आपला आवडता अभिनेता नसल्याचा खुलासा केला होता. पत्रकाराने तिला तिच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल विचारले होते. यासोबतच तिला शाहरुख खानची पत्नी गौरीचे उदाहरणही देण्यात आले की गौरीने आमिरला तिचा आवडता अभिनेता म्हटले होते. किरण रावने सलमान खानला आपला आवडता अभिनेता म्हणून संबोधले होते. 

किरण राव आहे सलमान खानची फॅनयावेळी तिच्यासोबत एक्स पती आमिर खानही उपस्थित होता. जेव्हा आमिरने सलमान तिला का आवडतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा किरण रावने सांगितले की मला फक्त सलमान खानला पडद्यावर पाहणे आवडते. किरणने सांगितले की, तिने सलमानचे सर्व चित्रपट पाहिले नसले तरी सलमानला पाहणे तिला खूप आवडते.

सलमानने किरणचे केले होते कौतुक सलमान खानही किरण रावच्या कामाचा मोठा चाहता आहे. जेव्हा तिच्या 'लापता लेडीज'चा प्रीमियर झाला होता, तेव्हा सुपरस्टारने त्याच्या X हँडलवर चित्रपटाच्या संपूर्ण टीमबद्दल एक नोट लिहिली होती. सलमानने लिहिले होते, 'वाह वाह किरण. मला आणि माझ्या वडिलांना खूप आनंद झाला. दिग्दर्शक म्हणून तुझ्या उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन. तू माझ्यासोबत कधी काम करणार?

टॅग्स :किरण रावआमिर खानसलमान खान