Join us

अभिषेक नाही तर श्वेताच्या नावावर अमिताभ बच्चन यांनी केला इतक्या कोटींचा 'प्रतीक्षा' बंगला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 11:03 AM

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. इतक्या वर्षांच्या मेहनतीवर त्यांनी जलसा, प्रतीक्षा, वत्स, जनक हे बंगले बांधले आहेत.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना लोक बॉलिवूडचे मेगास्टार म्हणतात. त्यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. वयाच्या या टप्प्यावर ते खूप सक्रिय आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी 'ब्रह्मास्त्र', 'उंचाई', 'झुंड' सारखे चित्रपट केले आहेत आणि त्यांच्याकडे आगामी काळात आणखी बरेच चित्रपट आहेत. इतक्या वर्षांच्या मेहनतीवर त्यांनी जलसा, प्रतीक्षा, वत्स, जनक असे बंगले बांधले. यातील एक बंगला त्यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीला भेट म्हणून दिला आहे. अमिताभ यांनी दिवाळीपूर्वी 'प्रतीक्षा' भेट म्हणून मुलगी श्वेताला दिला. रिपोर्टनुसार प्रतीक्षाची किंमत ५०.६३ कोटी रुपये आहे.

एक उत्तम अभिनेते असण्यासोबतच बिग बी हे एक चांगले कुटुंबीय देखील आहेत. त्यांची मुले अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा यांच्यावर त्यांचे खूप प्रेम आहे. त्यांचे नातवंड आराध्या, नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा यांच्यावरही खूप प्रेम आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी ८९०.४७ स्क्वेअर मीटर आणि ६७४ स्क्वेअर मीटर अशा दोन जमिनी श्वेता बच्चन नंदा हिला दिली आहे. ८ नोव्हेंबर रोजी त्यांनी ते श्वेता बच्चनला एका कराराद्वारे सुपूर्द केले. यासाठी अमिताभ बच्चन यांनी ५०.६५ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. हा बंगला अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी एकत्र भेट म्हणून दिला आहे.

अमिताभ बच्चन यांनी ४ फ्लॅट खरेदी केलेया वर्षी जुलैमध्ये अमिताभ बच्चन यांनी अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोडजवळील सिग्नेचर बिल्डिंगमध्ये २१व्या मजल्यावर ४ फ्लॅट खरेदी केले होते. अंधेरीतील एका कार्यालयासाठी त्यांनी ४३.१० रुपये मुद्रांक शुल्क भरले होते. फ्लॅटसाठी तीन पार्किंग स्लॉट समाविष्ट आहेत. वीर सावरकर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून त्यांनी हे फ्लॅट खरेदी केले होते.

अमिताभ बच्चन यांनी भाड्याने दिलेत फ्लॅटअमिताभ बच्चन यांनी हे ४ फ्लॅट भाड्याने देण्यासाठी घेतले होते. अशाप्रकारे अनेक सेलेब्स आहेत ज्यांनी फ्लॅट खरेदी करून भाड्याने दिले आहेत. ते गुंतवणूक करण्याचा हा एक उत्तम मार्ग मानतात. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन यांनी नुकताच अभिषेक बच्चनच्या 'घूमर' चित्रपटात कॅमिओ केला होता. ते 2898 एडीमध्ये दीपिका पादुकोण, प्रभास आणि दिशा पटानीसोबत दिसणार आहे. नाग अश्विनने याचे दिग्दर्शन केले आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चन