Join us

‘2.0’मध्ये अक्षय कुमार नाही तर हा हॉलिवूड स्टार बनणार होता खलनायक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 2:21 PM

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘2.0’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. टीजर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘2.0’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. टीजर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींना हा टीजर आवडला तर काहींना तो अपेक्षेइतका चांगला नसल्याची प्रतिक्रिया दिली. विशेषत: अक्षय कुमारच्या चाहत्यांनी हा टीजर पाहून सर्वाधिक नकारात्मक प्रतिक्रिया दिल्यात. संपूर्ण टीजरमध्ये अक्षय कुमारचा चेहरा फक्त एकदाच आणि तोही अगदी काही सेकंद दिसतो. यामुळे अक्षयच्या चाहत्यांमध्ये अनेक तक्रारीचे सूर उमटले. ‘2.0’मध्येरजनीकांत हिरोच्या भूमिकेत आहे तर अक्षय कुमार विलेनच्या अर्थात खलनायकाच्या भूमिकेत आहे. पण मीडियाची चर्चा खरी मानाल तर या भूमिकेसाठी अक्षय कुमार ‘2.0’च्या मेकर्सची पहिली चॉईस नव्हता. सुरूवातीला या भूमिकेसाठी अक्षयच्या भूमिकेसाठी एका हॉलिवूड हिरोला साईन करण्यात आले. 

होय, अक्षयआधी हॉलिवूड स्टार अर्नोल्ड श्वार्जनेगर याला या भूमिकेसाठी साईन करण्यात आले होते. पण अर्नोल्डने या चित्रपटासाठी काही अटी ठेवल्या होत्या. या अटी मेकर्सनी मानण्यास नकार दिला आणि ‘2.0’मधून अर्नोल्डचा पत्ता कट झाला. यानंतर या चित्रपटात अक्षय कुमारची एन्ट्री झाली. चित्रपटाच्या व्हिएफएक्सवर ५४४ कोटी रूपये खर्च झालेत. चित्रपट बनवण्यासाठी ३ हजारांवर टेक्निशियनची मदत घेतली गेली.निश्चितपणे भारतीय चित्रपटांच्या इतिहासात हा एक व्रिकम आहे. आजपर्यंत कुठल्याही चित्रपटाच्या व्हिएफएक्सवर इतका खर्च केला गेलेला नाही.या चित्रपटाची रिलीज डेट आजपर्यंत अनेकदा पुढे ढकण्यात आली. व्हिएफएक्समुळेच चित्रपटाचे प्रदर्शन लांबल्याची बातमी मध्यंतरी आली होती. या कारणामुळे चित्रपट यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल, असेही सांगितले गेले होते. पण ओव्हरनाईट आणि डबल शिफ्टमध्ये काम करून हे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे याचवर्षी या चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :2.0अक्षय कुमाररजनीकांत