Join us

गर्लफ्रेन्ड गिन्नीसोबत लग्न करावे की नाही? ​कपिल शर्मा कन्फ्युज्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 8:19 AM

याचवर्षी म्हणजे १८ मार्च २०१७ रोजी कपिल शर्माने आपल्या गर्लफ्रेन्डचे नाते जगजाहिर केले होते. होय, गिन्नी चतरथ हिच्यावरच्या प्रेमाची ...

याचवर्षी म्हणजे १८ मार्च २०१७ रोजी कपिल शर्माने आपल्या गर्लफ्रेन्डचे नाते जगजाहिर केले होते. होय, गिन्नी चतरथ हिच्यावरच्या प्रेमाची कबुली कपिलने दिली होती. ‘तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे...लव्ह यू गिन्नी...प्लीज वेल कम हर...आय लव्ह हर सो मच...,’ असे टिष्ट्वट त्याने केले होते. कपिल व सुनील ग्रोव्हरचा वाद चव्हाट्यावर आला, नेमका तोच हा काळ होता. यानंतर गत आठ महिन्यांत कपिलच्या आयुष्यात बरीच उलथापालथ झाली.सुनील शो सोडून गेल्यावर कपिल डिप्रेशनमध्ये गेला.या दिवसांत अगदी आत्महत्येचे विचारही त्याच्या मनात आले. तो मद्याच्या आहारी गेला. त्याच्या शोचा टीआरपी घसरला. अर्थात याकाळातही गिन्नी कपिलसोबत होती. मध्यंतरी गिन्नी व कपिल या दोघांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले होते. यानंतर कपिल व गिन्नीच्या लवकरच लग्न करणार, अशीही बातमी आली होती. पण कदाचिक कपिलचा तूर्तास तरी लग्नाचा कुठलाही प्लान नाही. केवळ प्लानच नाही इतकेच नाही तर गिन्नीसोबत लग्न करावे की नाही, याबद्दल तो कन्फ्युज्ड आहे.होय, अलीकडे एका मुलाखतीत स्वत: कपिलनेच ही कबुली दिली. ‘गेल्या काही महिन्यात माझ्यासोबत जे काही घडले, त्यामुळे कदातिच माझा माझ्यावरच विश्वास राहिलेला नाही. मी जबाबदारी घेण्यास तयार आहे की नाही, याबद्दल मी गोंधळात आहे. होय, मी प्रोफेशनल आहे. मी काम करतोय. पण लग्नासाठी मी तयार आहे की नाही, हे मला माहित नाही. मी हा असा आहे, हे मी गिन्नीलाही सांगितले आहे. खरे सांगायचे तर लग्न हे परमेश्वराच्या हातात आहे, असे मला वाटते. आपण खूप प्लानिंग करतो. पण ते व्हायचे तेव्हाच होते. असे नसते तर सरकारने लग्नाचे वय २१ वर्षे ठेवेले आहे. व्हायचे असते तर यावयात झाले असते. लग्न करण्यापूर्वी मला स्थिर व्हायचे आहे. सध्या मी लग्नासाठी तयार आहे, असे मला वाटत नाही,’असे कपिल म्हणाला.ALSO READ: SO SAD! ​कपिल शर्माची ‘ही’ एक इच्छा अखेर राहिली अपूर्ण...!!गिन्नी ही माझ्यापेक्षाही माझ्या आईच्या जवळ आहे. माझ्या आईला तिच्याबद्दल माझ्यापेक्षा अधिक माहित आहे. मी गिन्नीशी लग्न करावे, हा माझ्या आईचा हट्ट आहे. कारण मी थोडा वेडा आहे, हे आईला ठाऊक आहे आणि माझा वेडेपणा गिन्नीशिवाय दुसरी कुणीच सहन करू शकत नाही, हेही ती जाणते, असेही कपिलने सांगितले.