Join us  

OSCARS 2023: ज्युनियर NTR किंवा रामचरण 'नाटू-नाटू' गाण्यावर करणार नाही परफॉर्म! म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 12:55 PM

भारतात ऑस्कर 2023 ची जोरदार चर्चा होत आहे. चाहते SS राजामौली RRR साठी पुरस्कार जिंकण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ऑस्कर 2023 सोहळा आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. भारतात ऑस्कर 2023 ची जोरदार चर्चा होत आहे. चाहते SS राजामौली RRR साठी पुरस्कार जिंकण्याची आतुरतेने वाट पाहत असताना, दरम्यान, आरआरआर चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण चित्रपटाच्या नाटू नाटू या गाण्यावर स्टेजवर नाचणार नाहीत. खुद्द ज्युनियर एनटीआरने एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. ज्युनियर एनटीआरला विचारण्यात आले की तो आणि राम चरण ऑस्कर २०२३ च्या मंचावर RRR मधील गाण्यावर परफॉर्म करणार आहेत का? यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मीडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, जेव्हा अभिनेता ज्युनियर एनटीआरला विचारण्यात आले की हा चित्रपट सर्व जागतिक पातळीवर सर्वांना आवडेल असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता म्हणाला, 'मलाही हे माहित नाही, पण गाण्याच्या शूटिंगचा अनुभव मी सांगतोय... माझे पाय अजूनही दुखत आहेत.'

तीन तास करायचो रिहर्सलज्युनियर एनटीआर पुढे सांगितलं, 'डान्स स्टेप्स कठीण नव्हत्या पण जे अवघड होते ते एकत्रित करणे. आम्ही रोज तीन तास नृत्याचा सराव करायचो. त्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान आम्ही रिहर्सल करायचो. शूटिंगच्या एक आठवडा आधी आम्ही त्या गाण्यासाठी रिहर्सल केली आणि सेटवरही आम्ही रिहर्सल करत होतो. ते फक्त सिंक्रोनाइझेशनसाठी होते'.

झलक दिखला जा सीझन 6 ची रनर अप असलेली अमेरिकन अभिनेत्री आणि डान्सर लॉरेन गॉटलीब  ज्युनियर एनटीआर आणि राम चरण नाटू नाटू या गाण्यावर परफॉर्म करताना दिसणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

टॅग्स :आरआरआर सिनेमाज्युनिअर एनटीआरराम चरण तेजाTollywood