Join us

'चंद्रमुखी २'साठी कंगना राणौत नाही तर ही अभिनेत्री होती पहिली पसंती, या कारणामुळे नाकारला सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 13:49 IST

Kangana Ranaut : बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणौत लवकरच चंद्रमुखी २मध्ये दिसणार आहे.

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) लवकरच चंद्रमुखी २(Chandramukhi 2)मध्ये दिसणार आहे. तिचा हा चित्रपट १५ सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. खरेतर हा चित्रपट २००५ साली रिलीज झालेल्या चंद्रमुखीचा सीक्वल आहे. हा चित्रपट तमीळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड या भाषेत रिलीज होणार आहे. या चित्रपटात राघव लॉरेंस राजा वेट्टैयानची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर चंद्रमुखीची भूमिका अभिनेत्री कंगना राणौत निभावताना दिसणार आहे. कंगनाच्या आधी या भूमिकेसाठी दाक्षिणात्य अभिनेत्रीला विचारण्यात आले होते.

कंगना रानौत सध्या चंद्रमुखी २मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात कंगना वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. किपी वासू दिग्दर्शित या चित्रपटात सर्वात आधी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीच्या नावाचा विचार करण्यात आला होता. मात्र खासगी कारणामुळे तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्यानंतर चंद्रमुखीच्या भूमिकेसाठी कंगना राणौतची निवड करण्यात आली. साई पल्लवीकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. तसेच तिने हा चित्रपट का नाकारला यामागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

चंद्रमुखी २ हा अॅक्शन, कॉमेडी, हॉरर आणि रोमांसने परिपूर्ण असा चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये कंगना राणौत खूप सुंदर आणि वेगळी दिसते आहे. या ट्रेलरची सुरुवात एका हवेलीपासून होते. या हवेलीत चंद्रमुखी राहत असल्याचे बोलले जाते. या ट्रेलरमधील कंगनाच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. तिचे चाहते तिला या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात कंगना राणौत व्यतिरिक्त राघव लॉरेंस, वादिवेलु, राधिका सरथकुमार, लक्ष्मी मेनन हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती लाइक प्रोडक्शनने केले आहे. तर एमएम किरावनीने या चित्रपटाला संगीत दिले आहे.
टॅग्स :कंगना राणौतचंद्रमुखी