Join us  

'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 12:29 PM

Kiran Rao And Aamir Khan : किरण राव अभिनेता आमिर खानची एक्स पत्नी आहे. २०२१ साली त्या दोघांनी १६ वर्षांचे नाते संपुष्ठात आणले आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आता एका मुलाखतीत किरण रावने आमिर खान आणि तिच्या रिलेशनशीपवर भाष्य केले.

किरण राव (Kiran Rao) सध्या 'लापता लेडीज' (Lapata Ladies Movie) सिनेमाचं यश एन्जॉय करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान(Aamir Khan)ने केली आहे आणि दिग्दर्शन किरण रावने केले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत किरण रावने तिच्या आणि आमिर खानच्या डेटिंगबद्दल सांगितले. त्यांची पहिली भेट 'लगान' (Lagan Movie) चित्रपटाच्या सेटवर झाली होती. किरण राव अभिनेता आमिर खानची एक्स पत्नी आहे.  २०२१ साली त्या दोघांनी १६ वर्षांचे नाते संपुष्ठात आणले आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आता एका मुलाखतीत किरण रावने आमिर खान आणि तिच्या रिलेशनशीपवर भाष्य केले. 

किरण रावची अशी झाली 'लगान'मध्ये एंट्रीकिरण रावने सांगितले की, तिने रंग दे बसंतीच्या सेटवर आमिरसोबत राहून तिने तिचा पहिला चित्रपट धोबी घाटची कथा लिहिली होती.  Cyrus Says नामक एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत किरणने सांगितले की, कसे आमिरची पहिली पत्नी रिमा कागतीच्या एका कॉलमुळे तिला आमिरसोबत पहिल्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली. किरण राव म्हणाली की, मी त्यावेळी जॉब करत होते जेव्हा रिमा कागतीचा मला फोन आला होता. ती म्हणाली की, इथे भुजमध्ये एका सिनेमाचं शूटिंग होत आहे, तर तुला यायचे आहे का? फक्त तीन महिन्याची गोष्ट आहे आणि चांगलं काम आहे. हा सिनेमा लगान होता, ज्याचं शूटिंग जवळपास ६ महिने चालू होते. किरण रावने सांगितले की, त्यावेळी तिने बरेच हिंदी चित्रपट पाहिले नव्हते आणि ती त्यावेळी तिथे जायला तयार झाली.

६ महिने चाललं 'लगान'चं शूटिंगकिरण म्हणाली की, "आमिर खान १०० वर्षांपूर्वीच्या स्पोर्ट्सवर आधारित चित्रपट बनवत होता तेही अवधी भाषेत. हा खूप मोठा धोका तो पत्करत होता, मी या गोष्टी हळूहळू शिकले आणि ते माझ्यासाठी फिल्म स्कूलसारखे होते. किरण राव लगानच्या सेटवर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. तिने सांगितले की शूट ३ महिने चालणार होते पण हा चित्रपट क्रिकेटवर आधारित असल्याने तो ६ महिन्यांपर्यंत वाढवण्यात आला. हे वर्ष त्याच्यासाठी खूप चांगले होते कारण लगान सोबतच या वर्षी त्याने मान्सून वेडिंग केला होता. किरण रावने सांगितले की, त्यावेळी रीमा आणि झोया 'दिल चाहता है'चे शूटिंग करत होत्या आणि त्यामुळे तिला अतिरिक्त कास्टिंगसाठी गोव्याला पाठवले. 

या चित्रपटाच्या वेळी करू लागले एकमेकांना डेटरीमा स्वदेशच्या सेटवर काम करत होती तेव्हा आमिर खानसोबत तिची चर्चा पुन्हा सुरू झाली. आमिर त्यावेळी मंगल पांडे या चित्रपटाचे शूटिंग करत होता. यावेळी किरण राव आणि आमिर खान दोघेही एकमेकांना डेट करू लागले. यानंतर आमिर रंग दे बसंतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आणि किरण रावनेही त्याच्यासोबत ट्रॅव्हेल केले. किरण राव तीन महिने आमिर खानसोबत शूटवर होती आणि याच काळात तिने तिचा धोबी घाट हा चित्रपट लिहिला. किरण रावने २००५ मध्ये आमिर खानशी लग्न केले. दोघांना एक मुलगाही आहे. जरी आता त्यांचा घटस्फोट झाला आहे.

टॅग्स :आमिर खानकिरण राव