Join us

करिश्माच नाही तर ईशा देओलनेही अभिषेक बच्चनला लग्नासाठी दिला होता नकार, वाचा कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 7:20 PM

करिश्माप्रमाणे ईशा देओलची (Esha Deol )आई हेमा मालिनी यांनाही ईशाने अभिषेकसोबत ( लग्न करावे अशी ईच्छा होती. दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. अभिषेकही जावई म्हणून हेमा मालिनी यांना पसंत होता. पण ईशाला हे लग्न मान्य नव्हते.

रेशीमगाठी स्वर्गातच जुळतात असं म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकलेले दाम्पत्य हाच जन्म नाही तर सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. कुणी कल्पनेतही विचार केला नसेल की बच्चन कुटुंबाची ऐश्वर्या सून बनेल. मात्र रेशीमगाठीत स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात ते काही चुकीचं नाही.ऐश्वर्या राय आणि अभिषेकसाठी 2007 हे वर्ष थोडं खास होतं.. कारण जानेवारी महिन्यात दोघांची प्रमुख भूमिका असलेला 'गुरु' रुपेरी पडद्यावर झळकला. रिलीजनंतर अवघ्या दोन दिवसांनी दोघांची एन्गेजमेंटही झाली. गुरुच्या सुपरडुपर यशानंतर ऐश-अभि 20 एप्रिल 2007 रोजी रेशीमगाठीत अडकले. उत्तर भारतीय आणि बंगाली पद्धतीने दोघांचं शुभमंगल पार पडलं आणि ऐश्वर्या राय बनली ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan).

16 नोव्हेंबर 2011 रोजी ऐशनं एका गोंडस परीला जन्म दिला. बेटी बी नावानं सुरुवातीला ओळखल्या जाणार्‍या या परीचं नंतर आराध्या असं नामकरण करण्यात आलं. चित्रपटसृष्टीची सुपर हिरोईन ठरलेली ऐश पूर्णपणे आपल्या संसारात आणि आराध्यामध्ये दंग झाली.त्यामुळं तिला सुपर मॉम हे नावंही पडलं. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा सुखी संसार सुरु आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांची लव्हस्टोरी अनेकदा चर्चेचा विषय ठरते. यामुळे करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचा मोडलेला साखरपुडाही चर्चेत असतो. 

अभिषेकच्या आयुष्यात आलेली पहिली तरुणी ही करिश्मा कपूर (Karishma Kapoor) होती. करिश्मा-अभिषेक बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. त्याचकाळात अभिषेकला 'रेफ्यूजी' हा पहिला सिनेमा मिळाला. या सिनेमात त्याच्या अपोझिट करिश्माची धाकटी बहीण करीना कपूर होती. करीना सेटवर अभिषेकला भावोजी अशी हाक मारायची असं बोललं जातं. करिश्मा नेहमी अभिषेकला भेटायला सेटवर यायची. अभिषेकचा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला, मात्र दोघांचे प्रेम फुलतच गेले.दोघांचा साखरपुडाही झाला मात्र या नात्याला कुणाची तरी नजर लागली. अभिषेकसोबत लग्नानंतर करिश्माने सिनेमात काम करु नये, अशी जया बच्चन यांनी तिला अट घातल्याचे बोललं जातं. ही अट करिश्माची आई बबिता यांना मात्र मान्य नव्हती. कारण त्याकाळी अभिषेकचे अनेक सिनेमे फ्लॉप होत होते. तर करिश्मा आघाडीची अभिनेत्री होती.या कारणामुळे दोघांचेही ठरलेले लग्न मोडले. 

करिश्माप्रमाणे ईशा देओलची (Esha Deol )आई हेमा मालिनी यांनाही ईशाने अभिषेकसोबत लग्न करावे अशी ईच्छा होती. दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. अभिषेकही जावई म्हणून हेमा मालिनी यांना पसंत होता. पण ईशाला हे लग्न मान्य नव्हते. भावाप्रमाणे अभिषेकला मानते असे ईशाने सांगितले होते.ईशानेनंतर बिझनेसमन भरत तख्तानीसह लग्न केले. दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. दोघांचेही लव्हमॅरेज आहे. 

 

टॅग्स :इशा देओलअभिषेक बच्चन