बॉलिवूडच्या कलाकारांच्या अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चा सतत रंगत असतात. ब्रेकअप झालेल्या कलाकारांची यादीही मोठी आहे. कितने अजीब रिश्ते हैं यहाँ…. या गाण्याच्या ओळी बॉलीवूडसाठी अगदी चपखल बसतात. कारण इथे कधी नवी नाती बनतात आणि कधी बनलेली नाती अगदी सहज तुटतात याचा काही नेम नाही. कधी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दुरावतात तर कधी एकमेकांची तोंडंही न पाहणारे बंधनात अडकतात. असंच काहीसं घडलं ते बॉलिवूडची इलू इलू गर्ल मनिषा कोईरालासोबत.
19 जून 2010 साली नेपाळी उद्योजक सम्राट दहल यांच्याशी मनिषा रेशीमगाठीत अडकली होती.मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा कधीच लग्नबंधनात अडकणार नसल्याचा तिने निर्णय घेतला होता. तिच्या तुटलेल्या लग्नाचा आजही तिला पश्चाताप असल्याचे तिने सांगितले होते.
लग्नापूर्वीही एक नाही तर १२ वेळा मनिषा प्रेमात पडली. तिचे हे अफेअरही प्रचंड गाजले.यात सगळ्यात जास्त नाना पाटेकर यांच्यासोबत असलेले तिचे अफेअर गाजले. विशेष म्हणजे दोघांनीही जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली असल्याचे बोलले जाते. नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांची पहिली भेट १९९६ मध्ये सिनेमा 'अग्निसाक्षी'च्या सेटवर झाली होती. त्यावेळी मनिषाचं अभिनेता विवेक मुक्षानशी ब्रेकअप झालं होतं.
मनिषाला नाना पाटेकर पहिल्याच भेटीत आवडले होते. सिनेमाचया शूटिंग दरम्यान दोघांमधील जवळीक वाढली आणि त्यांनी गुपचूप एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.'अग्निसाक्षी'नंतर नाना आणि मनिषा यांनी 'खामोशी' या सिनेमातही एकत्र काम केलं. अभिनेत्री आयशा जुल्कामुळे दोघांमध्ये दुरावा आल्याचेही बोलले जाते.
दोघांचे ब्रेकअप नंतरही अनेकदा मनिषा प्रेमात पडली. पण काही ना काही कारणामुळे तिचे हे नाते लग्नापर्यंत काही पोहचले नाही.मुळात त्यावेळी मनिषाचे करिअरही आघाडीवर होते. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. तिच्या अभिनयावरच नाही तर सौंदर्यावरही चाहते फिदा व्हायचे. आज मनिषा सिनेसृष्टीपासून दूर असली तरी तिची लोकप्रियता आजही कायम आहे. चाहते आजही तिच्यावर तितकेच प्रेम करतात.