Join us

सोनमच नव्हे तर ‘या’ अभिनेत्रींनी निवडला बिझनेसमन लाइफ पार्टनर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 7:16 AM

-रवींद्र मोरे नुकतेच अभिनेत्री सोनम कपूरने दिली येथील बिझनेसमन आनंद आहूजासोबत लग्न केले. बऱ्याच चाहत्यांचा असा समज असतो की, ...

-रवींद्र मोरे नुकतेच अभिनेत्री सोनम कपूरने दिली येथील बिझनेसमन आनंद आहूजासोबत लग्न केले. बऱ्याच चाहत्यांचा असा समज असतो की, एखादी अभिनेत्री आपल्या क्षेत्राशी निगडित असलेल्या अभिनेत्यासोबतच लग्न करुन आपले जीवन व्यतित करेल. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी आपल्या आवडत्या अभिनेत्यासोबत लग्न करुन सुखी संसार स्थापित केला आहे. मात्र सोनम कपूर सारख्याच काही अभिनेत्रींनी बिझनेसमन लाइफ पार्टनर निवडला आहे. आज आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेऊया...* शिल्पा शेट्टी - राज कुंद्राशिल्पा शेट्टी २००७ मध्ये एका रिअ‍ॅलिटी शोची विजेती ठरल्याने खूपच चर्चेत होती. त्याच दरम्यान बिझनेस जगतात प्रसिद्ध असलेले राज कुंद्रा यांच्याशी शिल्पाची भेट लंडनमध्ये एका परफ्यूम ब्रॅण्डच्या प्रमोशनवेळी झाली होती. राज यांनी शिल्पाला हा ब्रॅण्ड प्रमोट करण्यासाठी मदत केली होती. याचकाळात दोघांनी डेटिंग सुरु केले आणि २००९ साली लग्न केले. या दाम्पत्याला वियान नावाचा एक मुलगा आहे. शिल्पाने १९९३ साली आलेल्या 'बाजीगर'द्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. याशिवाय तिने 'आओ प्यार करें' , 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी', 'छोटे सरकार', 'हिम्मत', 'जमीर'  सह अनेक सिनेमांत भूमिका केल्या आहेत. * असिन - राहुल शर्माअसिन २०१२ मध्ये 'हाउसफुल-2' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निघाली असता विमानतळावर तिची बिझनेसमन राहुल शर्मा यांच्याशी भेट झाली होती. विशेष म्हणजे अक्षय कुमारनेच दोघांची भेट घालून दिली होती. या भेटीनंतर मात्र दोघांचे फोनवर बोलणे आणि त्यानंतर भेटीगाठी सुरु झाल्या आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. राहुल यांनीच असिनला लग्नाची मागणी घातली होती. असिनच्या होकारानंतर  १९ जानेवारी, २०१६ मध्ये दोघेही लग्न बंधनात अडकले. असिनने २००५ मध्ये 'गजनी' या सिनेमाद्वारे डेब्यू केले होते. त्यानंतर 'लंडन ड्रीम्स', 'रेडी' , 'हाउसफुल-2', 'बोल बच्चन' आदी चित्रपटात असिनने महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे.  * जुही चावला - जय मेहतासाऊथ आफ्रिकेत एका सिनेमाच्या शूटिंगवेळी एका मित्राने जुहीची भेट बिझनेसमन जय मेहतांसोबत करुन दिली होती. जय मेहता हे मेहता ग्रुपचे ते चेअरमन आहेत. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. खरं तर जय मेहता विवाहित होते. पण त्यांची पत्नी सुजाता बिरला यांचा याकाळात मृत्यू झाला. दरम्यान जय मेहतांच्या आईचीसुद्धा प्रकृती खालावली. यावेळी जुहीने जय यांच्या आईची सुश्रुषा केली. ही जवळीकता वाढल्याने जुहीने त्यांच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला आणि १९९५ मध्ये दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले. दोघांना जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुलं आहेत. जुहीने १९८६ मध्ये आलेल्या 'सल्तनत' या सिनेमाद्वारे डेब्यू केले होते. याशिवाय 'कयामत से कयामत तक', 'राधा का संगम', 'आईना', 'डर', 'अंदाज' अशा अनेक चित्रपटात काम करून आपले अभिनय कौशल्य सादर केले आहे. * आयशा टाकिया - फरहान आझमीआयशा आणि रेस्तरॉँ व्यवसायी फरहानची भेट त्यांच्याच एका रेस्तराँमध्ये झाली होती. हळूहळू दोघांची मैत्री वाढली आणि त्यांनी डेटिंग सुरु केले. त्यानंतर त्यांनी २००९ मध्ये लग्न केले. या दोघांचा एक मुलगा असून मिकेल हे त्याचे नाव आहे. फरहान हा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे. त्यांचे मुंबईत रेस्तराँ आहेत. आयशाने २००४ साली आलेल्या 'टार्जन द वंडर कार' या सिनेमातून डेब्यू केले होते. त्यानंतर 'शादी नंबर वन' , 'होम डिलिवरी', 'शादी से पहले', 'कैश', 'नो स्मोकिंग' या चित्रपटात आयशा झळकली आहे. * अमृता अरोरा - शकील लडककन्स्ट्रक्शन बिझनेसमन शकील लडक सोबतच्या अमृता अरोराच्या अफेअर्सची चर्चा जगजाहिर होती. विशेष म्हणजे बातम्यांनुसार, अमृता लग्नापूर्वीच प्रेग्नेंट राहिली होती. याच कारणामुळे दोघांना घाईघाईत लग्न उरकावे लागले होते. दुसरी गोष्ट म्हणजे अमृतासोबत लग्न करण्यासाठी शकीलने त्याची पहिली पत्नी निशाला घटस्फोट दिला होता. या दोघांना अजान आणि रयान ही दोन मुले आहेत. अमृताने २००२ साली आलेल्या 'कितने दूर कितने पास' या सिनेमाद्वारे डेब्यू केले होते. त्यानंतर ती 'आवारा पागल दीवाना', 'जमीन', 'रक्त', 'स्पीड' या सिनेमांमध्ये झळकली. मात्र तिला या सिनेसृष्टीत अपेक्षित यश मिळू शकले नाही.