बॉलिवूडचा भाईजान सलमान खान(Salman Khan)ने सूरज बडजात्याच्या 'मैने प्यार किया' (Maine Pyaar Kiya) या चित्रपटातून नायक म्हणून करिअरला सुरुवात केली. आजही सलमानचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतो. सलमानसोबत अभिनेत्री भाग्यश्री(Bhagyashree)नेही या चित्रपटातून पदार्पण केले होते आणि ती रातोरात स्टार झाली. तथापि, जेव्हा ती चित्रपटसृष्टीत यशाच्या शिखरावर असताना तिने आपल्या कुटुंबासाठी बॉलिवूडला राम राम केला होता. सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटाने सलमान खानसाठी स्टारडमचा मार्ग खुला केला. पण, या चित्रपटासाठी भाग्यश्रीला सलमान खानपेक्षा पाचपट जास्त मानधन मिळाले होते.
'मैने प्यार किया' चित्रपटातील सीमाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री परवीन दस्तूरने एका मुलाखतीत या चित्रपटाशी संबंधित कलाकारांच्या फीचा खुलासा केला होता. परवीन दस्तूरने सांगितले होते की, भाग्यश्रीला सर्वाधिक मोबदला मिळाला आहे. तिने सुपरस्टार सलमान खानलाही मागे टाकले होते. परवीनला तिच्या भूमिकेसाठी २५ हजार रुपये मानधन मिळाले होते. या चित्रपटासाठी सलमान खानने ३१ हजार रुपये फी घेतल्याचे परवीन दस्तूरने सांगितले होते.
भाग्यश्रीला मिळालं होतं सर्वात जास्त मानधन
बॉलिवूड ठिकानाला दिलेल्या मुलाखतीत परवीर दस्तूर म्हणाली होती की, "मला २५,००० रुपये मिळाले होते आणि भाग्यश्रीला त्यावेळी सर्वात जास्त मानधन मिळाले होते. तिला १,५०,००० रुपये मिळाले होते. तिच्या मानधनावर आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो होतो. मात्र, मी हे सांगायलाच हवे की राजश्री हाऊसने चित्रपटसृष्टीतील इतर काही लोकांप्रमाणे कधीही आमची फसवणूक केली नाही."
१९८९चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटराजश्री प्रॉडक्शन निर्मित आणि सूरज बडजात्या दिग्दर्शित 'मैने प्यार किया' ब्लॉकबस्टर हिट ठरला. हा चित्रपट १९८९ चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता आणि भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. सुमारे ४.५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने त्यावेळी जवळपास २८ कोटींची कमाई केली होती.