Join us

समांथा नव्हे तर 'ही' अभिनेत्री करणार 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनसोबत जबराट डान्स? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 09:27 IST

'पुष्पा २' मधील आयटम सॉंगवर सध्याची बॉलिवूडमधील चर्चेतील अभिनेत्री अल्लू अर्जुनसोबत थिरकणार असल्याचं समजतंय

'पुष्पा २' ची उत्सुकता शिगेला आहे. अल्लु अर्जुनचा गेल्या अनेक दिवसांपासूनचा बहुप्रतिक्षित सिनेमा म्हणून 'पुष्पा २' ओळखला जातोय. 'पुष्पा २' बद्दल गेल्या काही महिन्यांपासून विविध अपडेट्स सोशल मीडियावर येत आहेत. 'पुष्पा' जेव्हा रिलीज झाला तेव्हा त्यातील 'उ अंटवा' गाण्याची चांगलीच चर्चा झाली. समांथा आणि अल्लु अर्जुनचा भन्नाट डान्स सर्वांना आवडला. आता 'पुष्पा २'मध्ये अल्लु अर्जुनसोबत आयटम सॉंग करताना कोण दिसणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर यावरचा पडदा बाजूला सरकला आहे.

ही अभिनेत्री करणार 'पुष्पा २'मध्ये आयटम सॉंग?

अनेकांना वाटत होतं पहिल्या भागाप्रमाणे 'पुष्पा २'मध्येही समांथा आणि अल्लू अर्जुन यांचा डान्स परफॉर्मन्स बघायला मिळेल. परंतु असं होणार नाही. 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर डान्स करणार असल्याचं बोललं जातंय. मेकर्सने अनेक अभिनेत्रींची नावं फायनल करुन श्रद्धाच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय. अर्थात याची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे. नुकताच 'स्त्री २' गाजवणाऱ्या श्रद्धाला अल्लू अर्जुनसोबत डान्स करताना पाहण्यास सर्वांना मजा येईल यात शंका नाही.

या तारखेला रिलीज होणार 'पुष्पा २'?

'पुष्पा द राईज' मधला पुष्पाचा लूक आणि त्या पात्रांची स्टाईल लोकांच्या पसंतीस पडली होती. त्यानंतर आता पुढच्या पार्टमध्ये काय असेल याची उत्सुकता चाहत्यांना आहे.  आता "पुष्पा २ द रुल" हा सिनेमा ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मिका मंदाना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. याशिवाय फहाद फाजिलही पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सुकुमार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पासमांथा अक्कीनेनीश्रद्धा कपूर