Join us

विकी कौशलचा 'छावा' नाही तर नेटफ्लिक्सवर हा साउथ सिनेमा बनला नंबर वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 11:49 IST

Chhaava Movie : ११ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'छावा' चित्रपटाला नेटफ्लिक्सवरील एका साउथच्या सिनेमाने मागे टाकले आहे.

विकी कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अक्षय खन्ना (Akshaye Khanna) यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'छावा' (Chhaava Movie) या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर त्याने प्रचंड कमाई केली. पण, जर तुमचा हा चित्रपट थिएटरमध्ये पाहायला राहिला असेल तर तुम्ही हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पाहू शकता. हो, छावा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. पण, चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणारा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करण्याऐवजी दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. ११ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'छावा' चित्रपटाला नेटफ्लिक्सवरील एका साउथच्या सिनेमाने मागे टाकले आहे.

नेटफ्लिक्सवर छावाला टक्कर देणारा हा चित्रपट दुसरा तिसरा तिसरा कोणता नसून तेलगू मिस्ट्री थ्रिलर चित्रपट 'कोर्ट स्टेट व्हर्सेस नोबडी' आहे, जो ओटीटीवर प्रेक्षकांकडून खूप पाहिला जात आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध आहे. हा चित्रपट १४ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि समीक्षकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

बॉक्स ऑफिसवर केलं जबरदस्त कलेक्शन'कोर्ट स्टेट व्हर्सेस नोबडी' हा तेलुगू चित्रपट १० कोटींमध्ये बनवण्यात आला होता तर बॉक्स ऑफिसवर त्याने ४९ कोटींचा जबरदस्त कलेक्शन केले होते. चित्रपटाची कथाच नाही तर कलाकारांच्या अभिनयाचेही प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. आता ओटीटीवरही या चित्रपटाची प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. हा चित्रपट राम जगदीश यांनी दिग्दर्शित केला होता. तर प्रियदर्शी पुलिकोंडा, शिवाजी, रोहिणी आणि हर्षवर्धनसारखे कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित करताना दिसले.

चित्रपटाची कथा'कोर्ट स्टेट व्हर्सेस नोबडी'च्या कथेबद्दल सांगायचं झालं तर, चित्रपटाची कथा एका गरीब मुलगा चंदूभोवती फिरते. चंदू एका श्रीमंत घरातील मुलीच्या प्रेमात पडतो. दोघेही फोनवर एकमेकांशी बोलत असतात आणि या काळात ते एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे दोघांनाही कळत नाही. मुलीच्या श्रीमंत पालकांना तिच्या प्रेमसंबंधाबद्दल कळल्यावर कथेला एक नवीन वळण मिळते. श्रीमंत मुलीचे वडील चंदूला खोट्या प्रकरणात अडकवतात, प्रकरण न्यायालयात पोहोचते. यानंतरच चित्रपटाची खरी कहाणी सुरू होते.

टॅग्स :'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदानाअक्षय खन्ना