जहीर इकबाल व प्रनूतन यांचा 'नोटबुक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जहीर व प्रनुतन दोघे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कड करत आहेत. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचा सेट चक्क तलावाच्या मध्यभागी बनवण्यात आला आहे.
'नोटबुक' चित्रपटात २००७ सालातील कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात तलवाच्या मध्यभागी असलेल्या एका शाळेवर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. त्यामुळे निर्मात्यांनी या चित्रपटाचा सेट पाण्यात बनवला आहे.
हा सेट बनवायला तीस दिवस लागले आणि त्यासाठी ८० लोकांनी चोवीस तास काम करून हा सेट बनविला आहे. या सेटचे डिझाईन दोन तरूणींनी केले असून उर्वी अशर व शिप्रा रावल असे त्यांची नावे आहेत.