बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आणि निर्माता प्रकाश झा यांची चर्चित 'आश्रम वेबसीरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जोधपूर सत्र न्यायालयानं आश्रमचे निर्माता प्रकाश झा आणि अभिनेता बॉबी देओल यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 11 जानेवारी रोजी होणार आहे. की 'आश्रम' ही वेबसीरीज एमएक्स प्लेयरवर रिलीज झाली होती. यात आश्रमात महिलांना होणारा छळ दर्शविला गेला आहे.जोधपूरमधील काही सामाजिक संस्थांनी आश्रम सीरिजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे या सीरिजच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असा आरोप त्यांनी केला आहे.
'आश्रम' वेबसीरिजचा पहिला सीझन रिलीज झाला होता तेव्हा निर्माते आणि कलाकारांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला होता. वेब सीरिजचा दुसरा सीझन आल्यानंतरही निर्मात्यांवर भावना दुखावल्याचा आरोप झाला. तथापि, वेबसीरिजचे मुख्य कलाकार बॉबी देओल आणि निर्माता प्रकाश झा यांनी सर्व आरोप सरसकट फेटाळले होते. ' न्यूज 18'च्या मुलाखती दरम्याम या दोघांनीही म्हटले होते की, त्यांनी साधु-संतांविषयी कोणत्याही प्रकारच्या भावना दुखावल्या नाहीत.
लॉकडाऊनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म हिट ठरला आणि अनेक वेबसिरीज, आणि फिल्मस या प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले. बॉबी देओलची आश्रम ही वेबसिरीजही तुफान हिट ठरली .प्रेक्षकांनी घरबसल्या याला चांगला प्रतिसाद दिला. मात्र आता ही सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.