‘पद्मावती’नंतर आता ‘या’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाला मिळाली जीवे मारण्याची धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 9:02 AM
संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ वरून निर्माण झालेला वाद शांत झाला नसतानाच आता आणखी एका चित्रपटावरून देशातील वातावरण तापण्याची ...
संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ वरून निर्माण झालेला वाद शांत झाला नसतानाच आता आणखी एका चित्रपटावरून देशातील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. होय, ‘पद्मावती’नंतर आता ‘गेम आॅफ अयोध्या’ या चित्रपटाविरोधातील सूर तीव्र झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता अमित गोस्वामी याने ‘गेम आॅफ अयोध्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील सिंह यांचे हात धडावेगळे करणाºयास एक लाख रूपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. सुनील सिंह यांनी फुकटची प्रसिद्धी लाटण्यासाठी हा चित्रपट बनवल्याचा आरोप अमित गोस्वामीने केला आहे. आपली न्यायव्यवस्था कोणालाही धर्माच्या भावनांशी खेळण्याची परवानगी देत नाहीत. हा चित्रपट अलीगढमध्ये प्रदर्शित झाला तर युवा नेते आणि विद्यार्थी या चित्रपटाविरोधात रस्त्यावर उतरतील. सुनील सिंह दिसतील तिथे त्यांना ठार मारू. यासाठी सर्वस्वी प्रशासन व सरकार जबाबदार असेल. उत्तर प्रदेश सरकारने या चित्रपटाच्या रिलीजवर नव्याने विचार करावा,असे गोस्वामीने म्हटले आहे.ALSO READ : दीपिका पादुकोणला दिला पाठींबा पण ‘पद्मावती’बद्दल हे काय बोलून गेलेत नाना पाटेकर! दिग्दर्शक सुनील सिंह हे लोक दलाचे नेते व माजी आमदार आहेत. हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला रिलीज होतो आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाच्या प्रदर्शनावर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली होती. पण फिल्म सर्टिफिकेशन अपिलेट ट्रिब्यूनलने मंजुरी दिल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा सिनेमा बाबरी मशिद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला आहे. यात हिंदू- मुस्लिम प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. तूर्तास ‘पद्मावती’वरून देशातील वातावरण तापले आहे. या चित्रपटाच्या रिलीजला देशभर विरोध होतो आहे.‘पद्मावती’वरून निर्माण झाल्यात वादात आता ‘गेम आॅफ अयोध्या’ची भर पडली आहे.