...आता त्रिशाला होणार डॉ. त्रिशाला संजय दत्त, वाचा सविस्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 09:44 AM2018-05-22T09:44:18+5:302018-05-22T16:02:38+5:30

संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त हिने नुकतीच तिच्या आयुष्यातील एक सर्वात मोठी अ‍ॅचिव्हमेंटची बातमी सांगितली आहे. ज्यामुळे संजय दत्तला तिच्यावर गर्व वाटत आहे.

... now Drishti will be Dr. Trisha Sanjay Dutt, Read More !! | ...आता त्रिशाला होणार डॉ. त्रिशाला संजय दत्त, वाचा सविस्तर!!

...आता त्रिशाला होणार डॉ. त्रिशाला संजय दत्त, वाचा सविस्तर!!

googlenewsNext
िनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तची गणना इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार डॉटर्समध्ये केली जाते. भलेही त्रिशाला स्वत:ला ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर ठेवणे पसंत करीत असली तरी, सोशल मीडियावरील तिची लोकप्रियता कमालीची आहे. त्रिशालाने नुकतेच चाहत्यांशी तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी अचिव्हमेंट शेअर केली आहे. सर्वसामान्यपणे असे बघावयास मिळते की, स्टार्स डॉटर्समध्ये बॉलिवूड एंट्रीवरून रस्सीखेच बघावयास मिळते. काही स्टार डॉटर्स तर इयत्ता दहावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरच डेब्यू करण्यावर भर देतात. काही स्टार अशाही आहेत, ज्यांनी आपले शिक्षण अर्ध्यावरच सोडून बॉलिवूड चित्रपटांमध्ये एंट्री करणे पसंत केले. मात्र संजय दत्तची मुलगी यापेक्षा वेगळा विचार करणारी आहे. तिने अगोदर मास्टर डिग्री मिळविली आहे. एवढेच काय तर ती पुढच्या चार वर्षांमध्ये डॉक्टरेटचे शिक्षण पूर्ण करणार आहे. 
 

न्यू यॉर्कमध्ये राहत असलेली त्रिशाला हॉफ्स्ट्रा यूनिर्व्हसिटीमध्ये शिक्षण घेत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर पदवीदान सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या खास क्षणी त्रिशालासाठी एक अनोखा केकही तयार करण्यात आला होता. ज्यामध्ये तिच्या विषयांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचा एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्रिशाला संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे. सध्या ती फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावित आहे. २०१४ मध्ये तिने आपल्या पहिल्या ड्रीम ट्रेसेज हेअर एक्सटेन्शन लाइनची सुरुवात केली होती. तिने न्यू यॉर्कच्या जॉन जे कॉलेज आॅफ क्रिमिनल जस्टिसमधून लॉमध्ये ग्रॅज्युएशनही केले आहे. 
 

संजय दत्त आणि ऋचा शर्माने १९८७ मध्ये लग्न केले होते. पुढे त्रिशालाचा जन्म १९८८ मध्ये झाला होता. ऋचा ब्रेन ट्यूमर झाला होता. ज्यामुळे १० सप्टेंबर १९९६ मध्ये तिचे निधन झाले होते. आईच्या निधनानंतर त्रिशाला न्यू यॉर्कमध्येच आपल्या मावशीसोबत राहत आहे. पापा संजय दत्तच्या ती खूप क्लोज आहे. त्याचबरोबर तिची सावत्र आई मान्यता दत्त हिच्याशीदेखील तिची चांगली ट्यूनिंग आहे. त्रिशालाने शिक्षणावर भर द्यावा अशी संजूबाबाची सुरुवातीपासूच इच्छा राहिली आहे. 

Web Title: ... now Drishti will be Dr. Trisha Sanjay Dutt, Read More !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.