आता कान्सच्या रेड कार्पेटवर ‘नो सेल्फी’! ‘या’ कारणामुळे लादण्यात आली बंदी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 5:49 AM
फ्रान्सच्या कान्स शहरात दरवर्षी रंगणारा कान्स चित्रपट महोत्सव हा जगातला एक महत्त्वपूर्ण इव्हेंट असतो. कला आणि फॅशन जगतातील झगमगत्या ...
फ्रान्सच्या कान्स शहरात दरवर्षी रंगणारा कान्स चित्रपट महोत्सव हा जगातला एक महत्त्वपूर्ण इव्हेंट असतो. कला आणि फॅशन जगतातील झगमगत्या दुनियेत या महोत्सवाचे खास असे महत्त्व आहे आणि म्हणून अख्ख्या जगाच्या नजरा या सोहळ्यावर खिळलेल्या असतात. कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणा-या ललना, त्यांचे स्टाईल स्टेटमेंट पाहण्यासाठी सगळेच उत्सूक असतात. अलीकडेकाळात भारतातील अनेक सेलिब्रिटी या सोहळ्यात मिरवताना दिसताहेत. या महोत्सवाबद्दल एक अतिशय महत्त्वांचा निर्णय घेण्यात आला आहे. होय, यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवादरम्यान रेड कार्पेटवर सेल्फी काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. महोत्सवाच्या आयोजकांनी याविषयीची घोषणा केली. मुख्य कार्यक्रमाआधीच सेलिब्रिटींसोबत सेल्फी घेणा-यांची गर्दी होते. यामुळे कार्यक्रमाचा ताल बिघतो. सुव्यवस्था राखणे कठीण होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. निश्चितपणे चाहत्यांसाठी हा निर्णय निराशाजनक आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या सेलिब्रिटींसोबत सेल्फी घेण्याची अनेकांची इच्छा यंदा अपूर्ण राहणार आहे. अलीकडच्या काळात कान्स चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणा-या चित्रपटांपेक्षा या सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील अभिनेत्रींच्या पोशाखालाच अधिक महत्त्व आलेले दिसतेय. अनेक सेलिब्रिटींनी यावर आपली नाराजी बोलून दाखवली होती. २०१५ मध्ये भारतीय अभिनेत्री शबाना आझमी यांनी याबद्दल खंत व्यक्त केली होती. कान्सच्या दुस-या दिवशी फॅशनची जत्रा भरल्यासारखी वाटते. हा एक गंभीर चित्रपट महोत्सव आहे. फॅशन शो नाही, असे टिष्ट्वट शबाना आझमी यांनी केले होते. २०१६ मध्ये ऐश्वर्या रायचा कान्सच्या रेडकार्पेटवरील लूक मोठा चर्चेचा विषय ठरला होता. त्यावर्षी ऐश्वर्या बेज कलरचा गाऊन आणि ओठांवर पर्पल कलरचे लिपस्टिक लावून रेड कार्पेटवर उतरली होती. तिच्या या पर्पल लिपिस्टिकची सोशल मीडियावर बरीच खिल्ली उडवली गेली होती. ऐश्वर्याने रेड कार्पेटवर उतरण्याआधी टोपलीभर जांभळं खाल्ली असावीत, असे कुणी लिहिले होते. तर कुणी ऐश्वर्याने आपल्या मुलीचे क्रियॉन ओठांवर लावले असावेत, अशा शब्दांत ऐश्वर्याला लक्ष्य केले होते.ALSO READ :OMG !! कान्समध्ये सोनमने निवडलेली साडी होती बॉयफ्रेन्ड आनंद अहुजाची चॉईस!