चित्रपट "सैल्यूट"मध्ये सुपरस्टार आमिर खान ऐवजी बादशाह शाहरुख खान राकेश शर्मा यांची भूमिका करताना दिसण्याची शक्यता आहे. हो, हे खरं आहे मिळालेल्या माहितीनुसार आमिर खानने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे म्हणून आता अंतराळवीर राकेश शर्मा यांची भूमिका शाहरुख खान करताना दिसेल, राकेश शर्मा यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन महेश मथाई करत असून ह्या चित्रपटाचा अजून फर्स्ट लूक सुद्धा प्रदर्शित झालेला नाही.
एक कार्यक्रमात शाहरुख खानला ह्या चित्रपटाबद्दल विचारले असता त्याने ह्यावर बोलण्यास नकार दिला आणि म्हणाला "की मी यावेळी फक्त माझा आगामी चित्रपट "झिरो" वर लक्ष केंद्रित करणार आहे. तो पुढे म्हणाला की माझी भेट काही निर्माता आणि दिग्दर्शकांशी झाली आहे पण मी कोणाला ही होकार दिला नाही आहे.'' पण एका वृत्तपत्रात आलेल्या बातमी नुसार शाहरुखने ह्या चित्रपटात काम करण्यास होकार कळवला आहे.ALSO READ : शाहरुख खानने म्हटले, ‘माझ्या चित्रपटाच्या सेटवर महिलांची छेड काढण्याची कोणात हिंमत नाही’
बातमी आशीदेखील आहे की आमिर खान ने स्वतः शाहरुखचे नाव या चित्रपटाच्या निर्मात्यांना सुचवले आहे. आता या चित्रपटाच्या चित्रिकरणाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाचे चित्रीकरण सप्टेंबर २०१८मध्ये सुरू होईल असे समजते आहे. सध्या शाहरुख खान आपल्या आगामी चित्रपट "झिरो"ला घेऊन उत्सुक आहे. यात शाहरुख खान एका बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’या चित्रपटात अनेक व्हिज्युअल इफेक्ट्स दिसणार आहेत. शाहरूखची कंपनी रेड चिलीज् व्हीएफएक्सकडे हे काम आहे.शाहरूखच्या या चित्रपटासाठी विदेशातून एक्सपर्ट बोलवले गेलेत, असेही कळतेय. यंदा नाताळच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला ‘झिरो’ प्रदर्शित होणार आहे. सध्या शाहरुख छोट्या पडद्यावरदेखील सक्रिय आहे. त्याचा टेड टॉक्स या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे.