...आता सुपरस्टार महेश बाबूही मॅडम तुसादची वाढविणार शोभा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 11:37 AM2018-04-27T11:37:42+5:302018-04-27T17:07:42+5:30
सुपरस्टार महेश बाबूचा ‘भारत अने नेनु’ हा चित्रपट सध्या बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई करीत आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या यशामुळे ...
स परस्टार महेश बाबूचा ‘भारत अने नेनु’ हा चित्रपट सध्या बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई करीत आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या यशामुळे महेश बाबू आनंदी असून, आता त्यात आणखी भर घालणारी बातमी समोर येत आहे. होय, जगभरात प्रसिद्ध असलेल्या मॅडम तुसाद संग्रहालयात सुपरस्टार महेश बाबूचा मेणाचा स्टॅचू उभारण्यात येणार आहे. महेश बाबूने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत ही बातमी शेअर करताना लिहिले की, ‘प्रतिष्ठित मॅडम तुसादचा भाग बनल्यामुळे मी खूप आनंदी आहे. यासाठी माझ्या टीमचेही आभार, अतुल्य!’
महेश बाबूचे जगभरातील स्टारडम लक्षात घेऊनच मॅडम तुसादमध्ये त्याचा मेणाचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याठिकाणी त्याचा जो पुतळा उभारण्यात येईल तो कुठल्याही पात्रावर आधारित नसेल. महेश बाबूचा हा मेणाचा पुतळा निश्चितपणे जगभरातील त्याच्या चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय गिफ्ट असेल यात शंका नाही. दरम्यान, मॅडम तुसादच्या अधिकाºयांनी महेश बाबूची भेट घेऊन त्याच्या हुबेहुब प्रतिकृतीसाठी योग्य ती माहिती मिळवली. यासाठी महेश बाबूने मॅडम तुसादच्या अधिकाºयांचे आभारही मानले.
दरम्यान, महेश बाबू अभिनित ‘भारत अने नेनु’ जगभरात चांगली कमाई करीत आहे. चित्रपटात महेश बाबूने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाने दोन दिवसांत शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले असून, अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. ब्लॉकबस्टर ‘बाहुबली-२’च्या बरोबरीने चित्रपट कमाई करीत असल्याने आगामी चित्रपट किती कोटीपर्यंत मजल मारणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.