Join us

Now you see her, Now you don’t! फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचा ‘फुल्ल रोमान्स’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 3:29 PM

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा रोमान्स सध्या जोरात आहे. कुणापासूनही तो लपलेला नाही आणि फरहान व शिबानीने तो ‘पब्लिक’ करण्यात कुठलीही कसर सोडलेली नाही.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा रोमान्स सध्या जोरात आहे. कुणापासूनही तो लपलेला नाही आणि फरहान व शिबानीने तो ‘पब्लिक’ करण्यात कुठलीही कसर सोडलेली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्याही रिलेशनशिपच्या चर्चा आहेत. आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे. फरहान व शिबानी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. विश्वास बसत नसेल तर दोघांचेही सोशल अकाऊंट बघू शकता. फरहानने शेअर केलेल्या ताज्या पोस्टनंतर दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायला काहीही शिल्लक उरलेले नाही.

फरहानने शिबानीचे स्वत:सोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत फरहान कॅमेऱ्यासमोर हसत हसत पोज देतेय, याऊलट शिबानी लाजून चेहरा लपवताना दिसतेय. यानंतरच्या दुसºया फोटोत मात्र दोघेही कॅमेºयाला पाहून हसत आहेत. या फोटोंना फरहानने अगदी रोमॅन्टिक कॅप्शन दिलेय. होय, Now you see her, Now you don’t, असे त्याने लिहिले आहे. यात त्याने शिबानीला टॅगही केलेय. केवळ इतकेच नाही तर तिच्या नावासमोर लाल हार्ट इमोजी टाकला आहे.

  गत सप्टेंबरपासून फरहान व शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती. खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चचेर्ला तोंड फोडले होते. या फोटोत फरहान पाठमोरा होता. म्हणजे त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण हा फरहान आहे, हे ओळखायला लोकांना वेळ लागला नव्हता. यानंतर तर होय, तो मीच, असे खुद्द फरहाननेचं जाहिर केले होते. फरहान हा घटस्फोटित आहे. दोन मुलांचा बाप आहे. तूर्तास ‘द स्काज इज पिंक’च्या शूटींगमध्ये तो बिझी आहे. सोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर  गायिका, अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने करिअरची सुरूवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती.   

टॅग्स :फरहान अख्तरशिबानी दांडेकर