तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बायोपिकमध्ये एन.टी.आर. यांची पत्नी बसवाताराकम यांची भूमिका अभिनेत्री विद्या बालन साकारताना दिसणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी एनटीआर चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील त्यांनी सांगितली आहे.
तरण आदर्श यांनी ट्विटरवर एन.टी.आर. बायोपिकचे पोस्टर शेअर करून लिहिले की, एन.टी.आर. बायोपिक ९ जानेवारी, २०१९ला प्रदर्शित होणार आहे. यात एन.टी.आर. यांच्या भूमिकेत नंदामुरी बाळक्रिष्ण दिसणार आहे. त्यांच्यासह विद्या बालन, राणा दुग्गाबत्ती व सुमांथ हे कलाकार दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिश व निर्मिती बालाकृष्ण, विष्णू वर्धन इंदुरी व साई कोर्रापटी करणार आहेत.
विद्या बालनने बसवाताराकम यांच्या भूमिकेसाठी हार्मोनियमचे धडे गिरविले आहेत. केवळ सहा दिवसात ती बेसिक हार्मोनियम शिकली. तिचे प्रशिक्षक व संगीतकार नितीन शंकर यांनी विद्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. राजकारणासोबतच अभिनयातही नाव कमवलेले एनटीआर यांच्या जीवनप्रवासावर आधारित हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बालाकृष्णा, विष्णू वर्धन आणि साई कोरापटी करणार असून निर्माते क्रिश आहेत. हा चित्रपट ९ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. .