Join us  

Ranveer Singh: न्यूड फोटोशूटप्रकरणी पोलीस रणवीर सिंगच्या घरी पोहोचले, २२ ऑगस्टपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 8:00 PM

न्यूड फोटोशूट प्रकरणी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात रणवीर विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्याला चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली होती.

मुंबई-

न्यूड फोटोशूट प्रकरणी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात रणवीर विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्याला चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली होती. पण तो हजर न झाल्यानं मुंबई पोलीस आज थेट रणवीरच्या राहत्या घरी पोहोचले होते. पण रणवीर मुंबईबाहेर असल्यानं पोलिसांना परतावं लागलं आहे. पोलिसांनी रणवीरला दिलेल्या नोटीसनुसार त्याला चेंबूर पोलीस ठाण्यात आता २२ ऑगस्टपर्यंत हजर व्हावं लागणार आहे. 

एका मासिकासाठी रणवीरनं केलेल्या न्यूड फोटोशूटचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्या फोटोमुळे महिलांच्या भावना दुखावल्या गेल्याचा ठपका रणवीरवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी नोटीस देण्यासाठी मुंबई पोलीस आज रणवीरच्या घरी गेले होते. पण रणवीर कुटुंबीयांसह मुंबईबाहेर असल्याचं पोलिसांना कळालं. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना रणवीरला २२ ऑगस्टपर्यंत पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

नेमकं प्रकरण काय?अभिनेता रणवीर सिंगनं एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि गहजब झाला. रणवीरच्या फोटोशूटवर आक्षेप घेत मुंबईत चेंबूर येथे एफआयआर दाखल करण्यात आला. महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्याविरुद्ध भादंविच्या ३०२ आणि आयटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरवर महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याचा आरोप आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 292, 293, 509 आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम 67 (A) अंतर्गत रणवीरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणवीरवर ज्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या अंतर्गत त्याला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. त्याच्याविरुद्ध आयटी कायद्याच्या कलम ६७(ए) अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जो अजामीनपात्र आहे.

टॅग्स :रणवीर सिंगमुंबई पोलीसमुंबई