Join us  

एका बर्थ डे पार्टीमध्ये पोहोचली होती नुसरत भरूचा, तिला पाहून उर्फी जावेदला विसरले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 1:06 PM

Nusrat Bharucha : नुसरत भरूचा नुकतीच धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांच्या बर्थ डे पार्टीमध्ये पोहोचली होती. यावेळी अनेकांच्या नजरा तिच्या लूकवर होत्या.

Nusrat Bharucha : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा नुकतीच मुंबईत एका इव्हेंटमध्ये दिसली. यावेळचे नुसरत भरूचाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. जे व्हायरल झाले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर नुसरतचा फॅशन सेन्स टॉक ऑफ द टाउन बनला आहे.

नुसरत भरूचा नुकतीच धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांच्या बर्थ डे पार्टीमध्ये पोहोचली होती. यावेळी अनेकांच्या नजरा तिच्या लूकवर होत्या. यावेळी नुसरतने सॅटिन ड्रेस घातला होता. हाय स्लिट ड्रेसमध्ये ती फारच हॉट दिसत होती.

नुसरत फॅन्ससोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. फार कमी काळात नुसरत भरूचाने इंडस्ट्रीमध्ये आपलं एक वेगळं स्थान मिळवलं आहे. तिचे बरेच सिनेमे हिट झाले आणि म्युझिक व्हिडीओही हिट झाले. 

नुसरतचे हे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. फॅन्स नुसरतचा हा बोल्ड लूक पाहून अवाक् झाले आहेत. फॅन्स तिचं भरभरून कौतुक करत आहेत. पण नुसरतने यावेळी फॅन्सची तिच्या या लूकने झोप उडवली आहे. दरम्यान नुसरत लवकरच काही सिनेमांमध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :नुसरत भारूचाबॉलिवूड