Join us

'हे अन्यायकारक...'; 'ड्रीमगर्ल 2' मध्ये बॉलिवूड स्टारकिडने रिप्लेस केल्यामुळे नुसरत नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 18:23 IST

Nushrratt bharuccha: आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ मधून नुसरतला वगळण्यात आलं आहे.

आयुष्यमान खुरानाचा 'ड्रीम गर्ल 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ड्रीम गर्ल सुपरहिट झाला. त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाटत पाहत आहेत. परंतु, यावेळी आयुष्यानसोबत अभिनेत्री नुसरत भरुचा स्क्रीन शेअर करणार नसून एका स्टार किडने तिला रिप्लेस केलं आहे. त्यामुळे एका मुलाखतीमध्ये नुसरतने जाहीरपणे तिची नाराजी व्यक्त केली.

आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट येत्या 25 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात नुसरत भरुचा (nushrratt bharuccha) दिसली होती. परंतु, या सिनेमाच्या दुसऱ्या भागात तिला वगळण्यात आलं आहे. तिच्याजागी अभिनेत्री अनन्या पांडेला रिप्लेस करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणी नुसरतने नाराजी व्यक्त करत हा अन्याय असल्याचं म्हटलं आहे. नुसरत लवकरच 'अकेली' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचं प्रमोशन करत असतानाच तिने 'ड्रीम गर्ल 2' या सिनेमावर भाष्य केलं.

"मी ड्रीम गर्लचा एक भाग होते आणि मला संपूर्ण टीम खूप आवडचे. मी त्यांच्यासोबत केलेलं काम खूप मिस करते. पण, आता ड्रीम गर्ल 2 मध्ये मला का कास्ट केलं नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही. याचं उत्तर तेच लोक देऊ शकतात. मी त्याविषयी कुठलाही तर्क लावू शकत नाही. हा. पण, मी एक माणूस आहे आणि सहाजिकच मला सुद्धा दु:ख झालं", असं नुसरत म्हणाली.

पुढे ती म्हणते, "हो, हे अन्यायकारक आहे. पण हा त्यांचा निर्णय आहे. काही हरकत नाही." दरम्यान, ड्रीम गर्ल 2 आणि अकेला हे दोन्ही सिनेमा एकाच दिवशी रिलीज होणार आहे.  अकेला यापूर्वी १८ तारखेला रिलीज होणार होता. परंतु, सेन्सॉरच्या काही समस्येमुळे हा सिनेमा रिलीज करायला दिरंगाई झाली. त्यामुळे आता एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांमध्ये कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरत आहे.

टॅग्स :नुसरत भारूचाआयुषमान खुराणाअनन्या पांडेबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा