नवी दिल्ली – बंगाली फिल्म क्षेत्रातील अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ हिनं २६ ऑगस्टला एका बाळाला जन्म दिला. घटस्फोट घेतल्यानंतर नुसरतनं मुलाला जन्म दिला. सध्या आई-मुलगा दोघंही सुखरुप आहेत. नुसरत जहाँ आता सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावणंही सुरु केले आहे. परंतु नुसरत जहाँ घरातून बाहेर पडल्यानंतर मीडियाकडून त्यांना नेहमी गाठलं जातं. नुसरत जहाँच्या मुलाचे वडील कोण? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात पडला. आता नुसरत जहाँ मुलाच्या वडिलांचे नाव समोर आलं आहे.
नुसरत जहाँचा(Nusrat Jahan) एक्स पती निखील जैन(Nikhil Jain) याला मुलाच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारला असता त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की, नुसरतच्या मुलाशी माझं काही देणं-घेणं नाही कारण अनेक काळ नुसरत आणि मी वेगळे राहत होतो. निखील जैन याच्या या विधानाने नुसरत जहाँच्या मुलाबाबत अनेक प्रश्न उपस्थित राहिले. परंतु आता नुसरत जहाँच्या मुलाचं नाव समोर आलं आहे. नुसरत जहाँच्या बाळाचे वडील अभिनेता यश दासगुप्ता (Yash Dasgupta) हेच आहेत. नुसरत जहाँच्या मुलाचे बर्थ रजिस्ट्रेशन डिटेल्स कोलकाता म्युनिसिपल कॉरर्पोरेशनच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यामुळे मुलगा आणि त्याच्या वडिलांचे नाव जाहीर झाले आहे.
बर्थ रजिस्ट्रेशनमधून सगळी माहिती समोर
नुसरत जहाँच्या मुलाचे नाव ईशान दासगुप्ता असं लिहिण्यात आलं आहे. तर वडिलांचे नाव देबाशीश दासगुप्ता असं लिहिलं आहे. अभिनेता यश दासगुप्ताचं अधिकृत नाव देबाशीश दासगुप्ता असं आहे. त्यामुळे नुसरत जहाँच्या बाळाचे वडील यश दासगुप्ता आहेत हे उघड झालं आहे. नुसरतच्या मुलाचे वडील निखील जैन नसून यश दासगुप्ता आहे अशी चर्चा सुरू होती. परंतु अधिकृतपणे हे सिद्ध झालं आहे. काही दिवसांपूर्वी यश दासगुप्ताचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात तो बाळाला हातात घेतल्याचं दिसून आलं होतं.
नुसरत जहाँच्या बाळंतपणानंतर यश दासगुप्तानेच सोशल मीडियावरुन ही माहिती सार्वजनिक केली होती. नुसरत आणि बाळ दोघंही सुखरुप असल्याचं त्याने म्हटलं होतं. एकीकडे नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांची जोडी अनेकांना पसंत येत आहे. तर दुसरीकडे काहीजण दोघांच्या नात्यावर टीका करत आहेत. गेल्या दिवसांत कोलकात्यातील एका उद्घाटन सोहळ्यावेळी पत्रकारांनी त्यांना बाळाच्या पित्याबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर नुसरत काहीशा बिथरल्या. माझ्या मते, हा प्रश्न व्यर्थ आहे. एखाद्या महिलेला तिच्या बाळाचे वडील कोण आहे, हे विचारणं म्हणजे तिच्या चारित्र्यावर सवाल उपस्थित करणं आहे. बाळाच्या वडिलांना माहित आहे की, ते या बाळाचे वडील आहेत आणि आम्ही सोबत बाळाचे अतिशय चांगले संगोपण करत आहोत. यश (यशदास दासगुप्ता) आणि मी आम्ही चांगला वेळ घालवत आहोत, असं त्या म्हणाल्या होत्या. बाळाचा चेहरा केव्हा दाखवणार? असा एक प्रश्नही पत्रकारानं केला. यावर हे तुम्ही त्याच्या वडिलांना विचारा. तोच कुणालाही बाळाला पाहू देत नाही, असं नुसरत यांनी स्पष्ट केलं होतं.