बंगाली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ सध्या खूप चर्चेत आहे. पहिले कारण म्हणजे, निखील जैनसोबतचे तिचे लग्न मोडल्याची चर्चा आहे. दुसरे म्हणजे, नुसरत प्रेग्नंट आहे आणि तिसरे कारण काय तर प्रेग्नंट नुसरतच्या अफेअरच्या चर्चाही ऐकायला मिळते आहे. नुसरत जगाची पर्वा न करता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. नुकतेच तिच्या चाहत्यांनी असे काहीतरी पाहिले ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
नुकतीच नुसरत जहाँने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नुसरतने पांढरा टीशर्ट घातला आहे. ज्यामध्ये ती बेबी-बंप लपवण्याचा प्रयत्न करत असताना दिसते आहे.
नुसरतने या फोटोंमध्ये सनग्लास घातला आहे आणि एक व्यक्ती या मोठ्या सनग्लासेसमध्ये फोटो काढताना रिफ्लेक्ट होताना दिसत आहे.
हे फोटो शेअर केल्यावर नुसरत जहाँच्या चाहत्यांनी ही फोटो काढणारी व्यक्ती म्हणजेच तिचा कथित बॉयफ्रेंड यश शिवाय इतर कोणी नाही असा तर्कवितर्क लावायला सुरूवात केली. काही वेळातच नुसरतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. तर, दुसरीकडे चाहत्यांनी या पोस्टवर प्रश्नांचा भडीमारा केला.