Join us

आजोबाच्या मृत्यूनंतर दुस-याच दिवशी पार्लरमध्ये का गेली होती न्यासा? अजय देवगणने दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 11:40 AM

आजोबाचे निधन झाले असताना दुस-याच दिवशी न्यासा पार्लरमध्ये कशी जाऊ शकते?असा सवाल अनेक नेटक-यांनी केला होता.

ठळक मुद्देयापूर्वी अनेकदा न्यासा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.

यावर्षी मे महिन्यात अजय देवगणचे वडील आणि अ‍ॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचे निधन झाले होते. वीरू देवगण यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोकाकूल वातावरण होते. बॉलिवूडचे अनेक दिग्गज वीरू यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचले होते. पण आजोबाच्या निधनानंतर दुस-याच दिवशी अजयची लेक न्यासा ब्युटी पार्लरमध्ये धडकली होती. यामुळे न्यासा सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. आजोबाचे निधन झाले असताना दुस-याच दिवशी न्यासा पार्लरमध्ये कशी जाऊ शकते?असा सवाल अनेक नेटक-यांनी केला होता. आता न्यासाचे पापा अर्थात अजय देवगणने या प्रश्नाला उत्तर दिले आहे.

झूम टीव्हीसोबत बोलताना अजयने याबद्दल सांगितले की, ‘पापाच्या निधनानंतर घरी सगळेच दु:खात होते. न्यासा आणि युग दोघेही प्रचंड अपसेट होते. मी न्यासाला बोलवले आणि उदास होऊ नकोस. कुठे तरी बाहेर फिरून ये, असे  तिला सुचवले. ती बाहेर जायला तयार नव्हती. पण मीच तिला आग्रह केला. तिचे मूड थोडे चेंज व्हावे, हा माझा उद्देश होता. आम्ही सगळे मोठे इथे आहोत, सगळे सांभाळू, तू फिरून ये, असे मी तिला म्हणालो. ती आधी मानेना, पण मी आग्रह केल्यावर ती तयार झाली. पण कुठे जायचे, हे तिला कळेना. मग मीच तिला जा हेअर वॉश करून ये, असे सुचवले आणि न्यासा पार्लरमध्ये गेली.

फोटोग्राफर्सनी पार्लरमध्ये एन्टर करतानाचे तिचे फोटो घेतले आणि यानंतर लोकांनी न्यासाला सोशल मीडियावर ट्रोल करणे सुुरु केले. खरे तर मीच तिला बाहेर पाठवले होते. तिचे मूड चेंज व्हावे, हा माझा एकमेव हेतू होता. पण ती पार्लरमधून घरी आल्यावर पुन्हा रडू लागली. कारण तोपर्यंत सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाले होते. अशाप्रकारे मुलांना ट्रोल करणे खरोखर वाईट आहे,असेही अजय म्हणाला.अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा ही  सतत चर्चेत असते. यापूर्वी अनेकदा न्यासा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. कधी कपड्यांमुळे तर कधी लुकमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलेय.

टॅग्स :अजय देवगण