Join us

​‘ओ, चंद्रलेखा, जब जब तुझको देखा...! पाहा, ‘अ जेंटलमॅन’चे नवे गाणे!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 9:35 AM

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस या दोघांना आपण ‘अ जेंटलमॅन’ या चित्रपटात बघू शकणार आहोत. या चित्रपटाचे गाणे ‘चंद्रलेखा’ आज रिलीज झाले.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस या दोघांना आपण ‘अ जेंटलमॅन’ या चित्रपटात बघू शकणार आहोत. या चित्रपटाचे गाणे ‘चंद्रलेखा’ आज रिलीज झाले. ‘डिस्को डिस्को’ या याच चित्रपटातील पार्टी नंबरला लोकांना प्रचंड प्रतिसाद दिला होता.आता याच चित्रपटातील ‘चंद्रलेखा’ हे दुसरे पार्टी साँगही तुम्हा-आम्हाला असेच वेड लावेल.‘चंद्रलेखा’बद्दल बोलायचे तर हे एक पार्टी साँग आहे. सिद्धार्थ पार्टीत त्याचे सिंगींग टॅलेंन्ट दाखवतो आणि त्याच्या या टॅलेन्टवर जॅकलिन जाम भाळते. केवळ इतकेच नाही तर सेक्सी पोल डान्सने या गाण्याला एक नवा तडका देते. तिचा पोल डान्स पाहून एका क्षणासाठी सिद्धार्थही या गाण्यात आहे, हेही विसरायला होते. या गाण्यातील सिद्धार्थ आणि जॅकलिनची केमिस्ट्रीही पाहण्यासारखी आहे. दिग्दर्शक निधिमोरू आणि डीके यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या २५ आॅगस्टला आपल्या भेटीस येतो आहे. तोपर्यंत ‘चंद्रलेखा’ हे गाणे तुम्ही ऐका आणि ते किती आवडले, त्यातील जॅकलिनचा पोल डान्स किती आवडला, ते आम्हाला जरूर कळवा.ALSO READ : Don't miss : ​जॅकलिन फर्नांडिसचे ‘हे’ रूप तुम्ही पाहिलेयं? आधी या चित्रपटाचे नाव ‘रिलोडेड’ असे ठेवण्यात आले होते. मात्र नंतर ते नाव बदलून‘अ जेंटलमॅन; असे ठेवले गेले. अलीकडे या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. या ट्रेलरमध्ये  सिद्धार्थचे  सुंदर, सुशील आणि धाडसी  रूप पाहायला मिळाले होते. या चित्रपटात सिद्धार्थचा डबलरोल आहे. गौरव आणि ऋषी अशी दुहेरी पात्र त्याने रंगवलेली आहेत. तर जॅकलिनने काव्या नामक मुलीची भूमिका साकारली आहे. गौरव अतिशय शालिन मुलगा आहे. त्याच्याकडे सगळे काही आहे. केवळ प्रेमाची कमतरता आहे. अशात काव्या त्याच्या आयुष्यात येते. गौरव काव्यावर अतिशय पे्रम करतो. तिच्याशी लग्न करू इच्छितो. पण काव्याला काहीसा धाडसी मुलगा हवा असतो. गौरवमध्ये सगळे काही चांगले आहे. पण तो जरा जास्तच ‘सेफ’ आहे, असे काव्याला वाटत असते. याचदरम्यान चित्रपटात हुबेहुब गौरवसारख्या दिसणाºया ऋषीची एन्ट्री होते.