कधीकाळी अशी दिसायची जुही चावला, फोटो शेअर करून सांगितली आपबिती!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 1:20 PM
ही बाब तेवढीच खरी आहे की, वाढत्या वयानुसार आपल्या चेहºयात आणि शरीरात बरेचसे बदल होत असतात. मात्र कधी-कधी स्वत:च्या ...
ही बाब तेवढीच खरी आहे की, वाढत्या वयानुसार आपल्या चेहºयात आणि शरीरात बरेचसे बदल होत असतात. मात्र कधी-कधी स्वत:च्या चुकीमुळेही आपल्या चेहºयावर चुकीचे रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिच्याबरोबर घडले. नुकतेच जुहीने आॅस्ट्रिया येथून तिचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला. या फोटोमध्ये जुही मेकअपविना दिसत आहे. त्यामुळे तिला ओळखणे अवघड होत आहे. यावेळी तिने ट्विटरवर हेअर फॉल आणि स्किनच्या समस्येविषयीदेखील लिहिले. 'I suffered the most frightening chemical reaction on my scalp/face and learnt a harsh lesson .. so TODAY trashing the chemicals and embracing the BEST beauty kit ever !!!!'. जुहीने शेअर केलेल्या फोटोवर नजर टाकल्यास तिच्या चेहºयात एकदमच बदल झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या जुहीचे वय ५० वर्षे इतके आहे. तिने बॉलिवूडसह साउथ आणि काही वेब सिरीजमध्येही काम केले आहे. ती आगामी ‘झिरो’ या चित्रपटात कॅमिओ करताना बघावयास मिळणार आहे. काही काळापूर्वी जुही ‘गुलाब गॅँग’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसली होती. या भूमिकेबद्दल तिने सांगितले होते की, या चित्रपटानंतर मला कळून चुकले की, मी एक चांगली खलनायक आहे. वास्तविक ‘गुलाब गॅँग’नंतर आतापर्यंत तिला असा एकही रोल आॅफर करण्यात आला नाही. दरम्यान, जुहीने ‘कयामत से कयामत तक, स्वर्ग, शानदार, बोल राधा बोल, इज्जत की रोटी, अंदाज, साजन का घर, हम है राही प्यार के, फिर भी दिल है हिंदुस्तानी, भूतनाथ’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. जुही अजूनही बॉलिवूडमध्ये सक्रिय असून, आगामी काळात तिची अदाकारी असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे.