Gokulashtami 2018 :कृष्णावतारातला बालपणीच्या फोटोतला या अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का? बॉलीवूडचा आहे स्टार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 09:48 AM2018-09-03T09:48:06+5:302018-09-03T09:50:43+5:30

कृष्णाच्या अवतारातील हा त्याचा बालपणीचा फोटो आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी त्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसह त्यानं फॅन्सना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

On occassion of Gokulashtmi bollywood student shares his krishna look childhood pic, female fans of siddharth malhotra crazy about that pic | Gokulashtami 2018 :कृष्णावतारातला बालपणीच्या फोटोतला या अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का? बॉलीवूडचा आहे स्टार

Gokulashtami 2018 :कृष्णावतारातला बालपणीच्या फोटोतला या अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का? बॉलीवूडचा आहे स्टार

googlenewsNext

देशभर गोकुळाष्टमी आणि दहीकाल्याची धूम पाहायला मिळत आहे. बॉलीवूडचे सेलिब्रिटीसुद्धा या निमित्त फॅन्सना शुभेच्छा देतायत. याच पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला एक फोटो,दाखवत आहोत. हा फोटो कुणाचा आहे हे तुम्ही ओळखलंत का? कृष्णाच्या अवतारातील हा चिमुरडा बॉलीवूडचा स्टार कलाकार आहे. कोण आहे हा चिमुकला हे तुम्ही ओळखलं? हा चिमुरडा आहे 'स्टुडन्ट ऑफ द इयर' फेम अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा. कृष्णाच्या अवतारातील हा त्याचा बालपणीचा फोटो आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी सिद्धार्थने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसह त्यानं फॅन्सना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या फोटोसह कॅप्शनमध्ये शुभेच्छांसह एक आठवणही त्यानं फॅन्ससह शेअर केली आहे. आजीने अशाप्रकारे बाळकृष्णाच्या अवतारात तयार केल्याची आठवण त्याने फॅन्ससह शेअर केली आहे. मात्र हा फोटो काढताना एका झाडापुढे का उभं केलं?,कदाचित उंचीमुळे असावं असंही सिद्धार्थने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.या बालपणीच्या फोटोतील सिद्धार्थचा अंदाज त्याच्या फॅन्सना चांगलाच भावतो आहे. विशेषतः तरुणींना सिद्धार्थचा हा कृष्णावतार घायाळ करत आहे. 

 

 

Web Title: On occassion of Gokulashtmi bollywood student shares his krishna look childhood pic, female fans of siddharth malhotra crazy about that pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.