दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व निर्माता बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने गेल्या वर्षी 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत ईशान खट्टर मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील जान्हवीच्या कामाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटानंतर जान्हवीचा फॅन फॉलोविंग खूप वाढला आहे. नुकताच एका चॅट शोमध्ये जान्हवीने डेटिंगबद्दल आपले मत मांडले.
जान्हवी कपूरने एका चॅट शोमध्ये डेटिंग व फ्लर्टबद्दल विचारले, त्यावेळी तिने सांगितले की, 'माझा डेटिंग या संकल्पनेवर अजिबात विश्वास नाही, पण मला फ्लर्ट करायला फार आवडते.'
तिने पुढे सांगितले की, 'मला नवीन लोकांसोबत चर्चा करायला आणि अॅपवर सर्फिंग करायला खूप आवडते. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला व त्यांच्याशी नवीन विषयांवर चर्चा करायला आवडते. तसेच त्यांच्यासोबत बाहेर जायला आवडते. मी लोकांशी सतत चर्चा केल्यामुळे अनेक वेळा ते फ्लर्ट केल्यासारखे वाटते. हो मी फ्लर्ट करते पण लांबून मला माझ्या मर्यादा माहित आहेत.'
जान्हवी कपूरच्या कामाबद्दल सांगायचे तर ती सध्या 'कारगिल गर्ल' चित्रपटाचे चित्रीकरण करते आहे.
या चित्रपटात ती गुंजन सक्सेनाची भूमिका करताना दिसणार आहे आणि या चित्रपटात अंगद बेदी गुंजनच्या भावाची भूमिका करताना दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात पंकज त्रिपाठी गुंजनच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करणार आहेत आणि या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली होत आहे.