Join us

Uh Oh! भारतीय जवानांबद्दल बोलली श्रद्धा कपूर! नेटक-यांनी घेतले फैलावर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 8:13 AM

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर अलीकडे एक फोटो शेअर करून फसली. होय, फसली म्हणजे काय तर भलतीच फसली. इकडे तिने ...

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर अलीकडे एक फोटो शेअर करून फसली. होय, फसली म्हणजे काय तर भलतीच फसली. इकडे तिने फोटो शेअर केला आणि तिकडे नेटक-यांनी तिला जाम फैलावर घेतले. अनेक ट्विटर युजर्सनी तिला भारतीय जवानांचा आदर करण्याचा सल्ला दिला.आता श्रद्धाने शेअर केलेला फोटो कशाचा होता, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सूक असाल तर हा फोटो होता दोन जवानांचा.होय, हा फोटो शेअर करत श्रद्धाने भारतीय जवानांचे आभार मानले आहेत. ‘भारताचे जवान बर्फात गोठतात, जेणेकरून आपण गरम राहावे. जवान आपली रक्षा करतात. जेणेकरून आपण सुरक्षित राहावे. जवान आपल्या सुरक्षेत जीवन घालवतात आणि आपण त्यांचे साधे आभारही मानू शकत नाही,’ असे हा फोटो शेअर करत, श्रद्धाने लिहिलेयं. खरे तर श्रद्धाचा हेतू वाईट नव्हता. पण भारतीय जवान म्हणून तिने पोस्ट केलेला फोटो फेक निघाला. म्हणजे, ज्या दोन जवानांना श्रद्धाने भारतीय जवान सांगितले ते जवान भारताचे नाही तर रशियन आर्मीचे निघाले. मग काय, ट्रोलर्सनी एकसाथ श्रद्धावर हल्लाबोल केला.ALSO READ : दिवाळीच्या शुभेच्छा देणे श्रद्धा कपूरला पडले महाग! सांगायला गेली एक, झाले भलतेच!एका युजरने तिला ‘देशभक्तीची उल्टी करणारे’ म्हटले काहींनी असे बनावट फोटो पोस्ट करून भारतीय जवानांप्रति बनावटी प्रेम दाखवण्याची गरज नसल्याचे तिला सुनावले. आम्ही पण भारतीय सैन्यावर प्रेम करतो पण बनावट फोटो पोस्ट केल्याने प्रेम वाढत नाही, अशा शब्दात एका युजरने तिचा समाचार घेतला. एकंदर काय तर श्रद्धा भलतीच फसली. वृत्त लिहिपर्यंत तरी श्रद्धाने आपली ही पोस्ट डिलिट केली नव्हती.याआधीही दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करा, असे आवाहन केल्यामुळे श्रद्धाला असेच ट्रोल व्हावे लागले होते. एका ट्विटर युजरने थेट श्रद्धाच्या चित्रपटांच्या प्रमोशनच्या वेळचा एक फोटो पोस्ट करत श्रद्धाच्या दुटप्पीपणावर बोट ठेवले होते. श्रद्धाच्या या प्रमोशन इव्हेंटमध्ये फटाक्यांची जोरदार आतीषबाजी करण्यात आली होती.