Join us

अरेच्चा...! Same To Same.... ऐश्वर्या राय-बच्चनची सापडली Duplicate

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 2:16 PM

अनुष्का शर्मा, जॅकलिन फर्नांडिस यांच्यानंतर आता ऐश्वर्या राय बच्चनचेही ड्युप्लिकेट सापडली आहे.

एकाच चेहऱ्याच्या आणि सेम टू सेम दिसणाऱ्या सात व्यक्ती जगात असतात असे म्हटले जाते. सेलिब्रिटींचे तर अनेक डुप्लिकेट आपण पाहिले आहेत. अशाच सेम टू सेम दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये आता अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचाही उल्लेख करावा लागला. काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा व जॅकलिन फर्नांडिस यांचेही ड्युप्लिकेट असल्याचे पहायला मिळाले.

 ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याच्या चर्चा सगळीकडे होत असते. मात्र आता तिच्यासारखी दिसणारी व्यक्ती नुकतीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. ही व्यक्ती ईराणी मॉडेल असून तिचे नाव महलाघा जबेरी असे आहे. महलाघाचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. 

ईराणी मॉडेल महलाघाचा जन्म १७ जून, १९८९मध्ये ईराणमधील इस्फहान शहरात झाला.

महलाघा फिटनेस फ्रिक असून फिटनेससाठी ती योगाला प्राधान्य देते आणि ती न चुकता दररोज योगा करते. ती सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे इंस्टाग्रामवर २.३ मिलियन म्हणजे २३ लाख फॉलोवर्स आहेत.

महलाघाचा जन्म ईराणमध्ये झाला असला तरी मॉडेलिंग करियरमुळे ती अमेरिकेतील सैन डिएगोमध्ये राहते. ती मॉडेलिंग व्यतिरिक्त घोडेस्वारीची आवड आहे. याशिवाय महलाघाला रिकाम्या वेळेत शॉपिंग करायला आवडते. 

ऐश्वर्याच्या कामाबद्दल सांगायचे तर ऐश्वर्या शेवटची अतुल मांजरेकर यांच्या फन्ने खां चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती अनिल कपूर व राजकुमार राव सोबत दिसली होती. या चित्रपटात तिने सुपरस्टार बेबी सिंगची भूमिका केली होती. तिला कॅब ड्रायव्हर (अनिल कपूर) आणि त्याचा मित्र (राजकुमार राव) किडनॅप करतात.

सूत्रांच्या माहितीनुसार, ऐश्वर्या लवकरच तिचा नवरा अभिषेक बच्चनसोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव गुलाब जामुन असे आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन