Join us

ओम पुरी यांचा ‘रामभजन झिंदाबाद’ अडकला सेंसॉरच्या कात्रीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2017 1:04 PM

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता ओम पुरी यांचा आगामी चित्रपट ‘रामभजन झिंदाबाद’हा सेंसॉरच्या कात्रीत सापडला आहे. या चित्रपटात असेलेली शिवराळ भाषा ...

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता ओम पुरी यांचा आगामी चित्रपट ‘रामभजन झिंदाबाद’हा सेंसॉरच्या कात्रीत सापडला आहे. या चित्रपटात असेलेली शिवराळ भाषा व असभ्य वर्तन या कारणाने सेंसॉर बोर्ड प्रमाणपत्र देण्यास असमर्थ असल्याचे सांगण्यात येते. यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता सामोर ढकलावी लागणार आहे. ओम पुरी यांचे आपल्या करिअरमध्ये सक्रिय असताना त्यांचे निधन झाले होते. यामुळे त्याचे अनेक चित्रपट आगामी वर्षात येऊ घातले आहे. ओम पुरी यांच्या निधनानंतर सर्वांत आधी प्रदर्शित होणारा चित्रपट म्हणून रामभजन झिंदाबाद याचा उल्लेख केला जात होता. मात्र हा चित्रपट सेंसॉरच्या कात्रीत सापडला आहे. चित्रपटाचे सहनिर्माता खालिद किदवाई यांनी याबद्दलची माहिती दिली. खालिद म्हणाले, सेंसॉर बोर्डाने या चित्रपटातील भाषा शिवराळ आणि असभ्य असल्याचे कारण दिले आहे. आम्ही हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित करण्याची योजना आखत होतो. मात्र आता सेंसॉरने प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने आमच्या समोर अडचण निर्माण झाली आहे. आमच्या चित्रपटातील भाषा इरफान खानच्या पान सिंग तोमर या चित्रपटासारखीच आहे. Read More : ​सलमान खानचा ‘ट्युबलाईट’ असेल ओम पुरीचा शेवटचा चित्रपटरामभजन झिंदाबाद या चित्रपटाच्या प्रमाणीकरणासाठी आम्ही १० डिसेंबरला सेंसॉर बोर्डाकडे अर्ज केला होता, त्यांनी आम्हाला स्क्रिनिंगसाठी १० जानेवारीपर्यंतचा वेळ दिला होता. मात्र सदस्याने केवळ २० मिनिटे चित्रपट पाहिल्यावर त्यांनी आम्हाला नकार दिला. हे त्यांनी आम्हाला २० जानेवारीला पत्राद्वारे कळविले, असेही खालिद किदवाई म्हणाले. Read More : हे आहेत, ओम पुरी यांचे काही अविस्मरणीय चित्रपटरामभजन झिंदाबाद हा चित्रपट राजकीय विडंबन असलेला चित्रपट आहे, याचे दिग्दर्शन रणजीत गुप्ता यांनी केले आहे. या चित्रपटात दिवंगत ओम पुरी यांच्यासह कुलभुषण खरबंदा,सीमा आझमी, राम सेठी आणि श्वेता भारद्वाज यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात ओम पुरी यांनी गाणेही गायले आहे. उत्तर प्रदेशातील चिरौंजी गावातील रामभजन या मजुराची कथा आहे. सरकारी योजनांचा गैर फायदा घेणारा रामभजन  जातीच्या राजकारणाचा आणि भ्रष्टाचाराचा कसा सामना करतो हे या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. ALSO READ ओम पुरी यांचे वादग्रस्त जीवनOm Puri Biopic : नंदिता पुरीसह चार निर्मात्यांत ‘कोल्ड वॉर’