लोकप्रियतेच्या शिखरावर असणारे अभिनेता पंकज त्रिपाठी यांची गावाशी नाळ अजुन जोडलेली आहे. याचा अनुभव नुकताच आला. पंकज त्रिपाठी यांनी वडिलांच्या स्मरणार्थ गावातील शाळेत पुस्तक वाचनालय सुरू केले.
बिहारमधील गोपालगंज येथील बेलसंड हे त्यांचे गाव आहे. पंकज त्रिपाठी आपल्या करिअरमुळे मुंबईत राहतात, तर त्यांचे आई-वडील गावीच राहायचे. पंकज त्रिपाठी वडिलांच्या खूप जवळचे होते. पंकज यांचे वडील पंडीत बनारस तिवारी यांनी बेलसांड या त्यांच्या मूळ गावी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
पंकज त्रिपाठी यांनी वडिलांच्या स्मरणार्थ गावातील एका उच्च माध्यमिक शाळेत पुस्तक वाचनालय सुरू केले आहे. या ग्रंथालयात मनोरंजक, प्रेरणादायीसह अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तके देखील संग्रहित आहेत.
पंकज त्रिपाठी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकतेच त्यांचा 'ओह माय गॉड 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवरही गल्ला जमवण्यात या चित्रपटाला चांगलेच यश आले आहे. तर पंकज त्रिपाठी हे लवकरच रिलीज होणाऱ्या 'फुकरे 3' या चित्रपटात दिसणार आहे.
येत्या 28 सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ते कॉमेडी करताना दिसणार आहे. याशिवाय त्यांनी अटल बिहारी बायोपिकचे शूटिंग पूर्ण केले आहे. पंकज यांना नुकताच 'मिमी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.