Join us

'OMG 2' फेम अभिनेता सुनील श्रॉफ यांंचं निधन, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 4:15 PM

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते सुनील श्रॉफ यांचं निधन झालं आहे. त्यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अक्षय कुमारच्या 'ओएमजी २'मध्ये ते झळकले होते.

मुंबई - हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते सुनील श्रॉफ (६६) यांचे निधन झाले आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. अचानक त्यांची प्रकृती जास्त बिघडली आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुले आणि इतर परिवार आहे. मालाड पश्चिमेकडील चारकोप नाका येथील हिंदू स्मशानभूमीत सुनील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सुनील यांच्या निधनाची बातमी त्यांच्या मुलांनी फेसबुक पोस्टद्वारे शेअर केल्यानंतर मनोरंजन विश्वातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुनील यांनी प्रचंड मेहनतीने मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. 'दीवाना', 'द्रोह काल', 'अंधा युग', 'अभय', 'जूली', 'द फायनल कॉल', 'तथास्तू', 'कबाड द कॉइन', 'शिद्दत' आदी बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वापूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी अभिनीत 'ओ माय गॉड २' हा सुनील यांचा अखेरचा चित्रपट ठरला. बऱ्याच आघाडीच्या ब्रँडच्या जाहिरातींमध्येही त्यांनी काम केले होते. 

 

 

सुनील श्रॉफ सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असायचे. त्यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेता पंकज त्रिपाठीबरोबर फोटो शेअर केला होता. २१ ऑगस्टला त्यांनी त्यांच्या जाहिरातीचा एक फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केला होता. तीच त्यांची शेवटची पोस्ट ठरली. 

टॅग्स :अक्षय कुमारसेलिब्रिटी