OMG! ज्या सीनने प्रिया प्रकाश वारियरला बनवले ‘इंटरनेट सेन्सेशन’, तो सीनचं मुळात चोरीचा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 7:38 AM
‘ओरू अडार लव’ या मल्याळम चित्रपटातील काही सेकंदाच्या क्लिपने अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरला एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनवले. या ...
‘ओरू अडार लव’ या मल्याळम चित्रपटातील काही सेकंदाच्या क्लिपने अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरला एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनवले. या एका सीनने प्रियाला कधी नव्हे इतकी प्रसिद्धी दिली. इतकी की, सोशल मीडियावर फॉलोअर्सच्या शर्यतीत प्रियाने अनेक बड्या बड्या दिग्गजांना मागे टाकले. पण ज्या सीनने प्रियाला एका रात्रीत स्टार बनवले, तो सीनचंं मुळात चोरीचे आहे, असे सांगितले तर? हा आमचा नाही तर एका मल्याळम निर्मात्याचा दावा आहे. होय,‘किडू’ या आगामी मल्याळम चित्रपटाचे निर्माते साबू पीके यांनी हा दावा केला. पुराव्यादाखल साबू यांनी सोशल मीडियावर दोन क्लिप्सही शेअर केल्या आहेत. हे प्रकरण तुम्हाला जरा गुंतागुंतीचे वाटू शकते. कारण आधी ‘किडू’चे दिग्दर्शक माजिद अबू यांच्यावर असाच आरोप झाला होता. माजिद यांनी प्रिया प्रकाश वारियर आणि रोशन अब्दुल यांच्यावर चित्रीत सीन्सची कॉपी केली असा आरोप ठेवण्यात आला होता. पण ‘किडू’च्या निर्मात्यांनी मात्र माजिद यांचा बचाव करत, या वादाला एक वेगळेच वळण दिले आहे. ‘ओरू अडार लव’च्या त्या चर्चित सीन्सआधी ‘किडू’च्या सीनचे शूटींग झाले होते. त्यामुळे चोरीचा आरोप आमच्यावर नाही तर ‘ओरू अडार लव’वर लागायला हवा, असे साबू यांनी म्हटले आहे. अर्थात याप्रकरणी कुठल्याही कारवाई करण्याचा विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘ओरू अडार लव’ ने आमच्या सीनची कॉपी केली, आम्ही नाही. याप्रकरणी कारवाई करणार का, असे मला अनेक लोक विचारत आहेत. पण मला हे करायचे नाही. कारण आमच्यालेखी हा खूप मोठा मुद्दा नाही. दोन्ही चित्रपटांत साम्य असू शकते. आपल्या आयुष्याचेही असेच आहे, असेही साबू म्हणाले.ALSO READ : प्रिया प्रकाश वारियरने फिल्मी करिअरबद्दल केला मोठा खुलासा! चाहत्यांचा होऊ शकतो हिरमोड!! या प्रकरणातील आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, ‘किडू’ आणि ‘ओरू अडार लव’ या दोन्हींची एडिटींग एकाच व्यक्तिने केली आहे. होय, अचु विजयन यांनी ही एडिटींग केली आहे. ‘किडू’च्या निर्मात्यांनी केलेल्या दाव्यानुसार, अचु विजयन यांनी ‘किडू’चे एडिटींग आधी संपवले. हे एडिटींग संपल्यानंतर त्यांनी ‘ओरू अडार लव’चे एडिटींग हाती घेतले.