​OMG : ढाब्यावर काम करीत होता ‘हा’ अभिनेता, आता आहे कोट्यधीश !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2017 12:57 PM2017-07-02T12:57:45+5:302017-07-02T18:27:45+5:30

-Ravindra More म्हणतात की, आयुष्यात जिद्द, चिकाटी, प्रयत्न आणि सचोटी असली की आपल्याला यशोशिखर गाठण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. ...

OMG: Actor who was working on the dhaba, is now a crorepati! | ​OMG : ढाब्यावर काम करीत होता ‘हा’ अभिनेता, आता आहे कोट्यधीश !

​OMG : ढाब्यावर काम करीत होता ‘हा’ अभिनेता, आता आहे कोट्यधीश !

googlenewsNext
ong>-Ravindra More
म्हणतात की, आयुष्यात जिद्द, चिकाटी, प्रयत्न आणि सचोटी असली की आपल्याला यशोशिखर गाठण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. म्हणजेच ध्येयाने प्रेरित झालेला मनुष्य कधीच अशस्वी होत नाही. मनुष्य नेहमी यश मिळविण्यासाठी प्रयत्नशिल राहिला की, त्याला आपोआपच यशस्वी होण्याचा योग्य मार्ग सापडतो. असाच एक बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आहे संजय मिश्रा. 
पोटासाठी ढाब्यावर टेबल पुसणारा, भाज्या आणि आॅमलेट बनवणारा हा सर्वसामान्य आचारी कम वेटर ते यशस्वी आणि कोट्यधीश अभिनेता हा संजय यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

Image result for sanjay mishra

बऱ्याच वर्षापासून संजय मिश्रा चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून काम करीत आहेत. पण, सुरूवातीच्या काळात त्यांचा चित्रपटसृष्टीत म्हणावा तसा जम बसला नाही. त्यामुळे त्यांना अभिनयातून मिळणारे उत्पन्नही तुटपूंजेच असे. अशा वेळी ते खचून जात पण त्यांन वडिल प्रोत्साहन देत. वडिलांच्या प्रोत्साहनानंतर ते नव्या उत्साहाने कामाला लागत. त्या काळात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण कधी कधी नियतीच्या मनात काही भलतेच असते. नियतीने त्यांना धक्का दिला. संजय यांच्या वडिलांचे निधन झाले आणि संजयवर जणू दु:खाचा डोंगरच कोसळला. 
संजय हे वडिलांच्या खूप जवळचे होते. वडिलांच्या निधनामुळे एकाकीपन आलेल्या संजय यांनी चित्रपटसृष्टीच सोडली. नैराश्य मनाने ते ऋषिकेशला गेले. तेथे ते एका ढाब्यावर काम करू लागले. वडीलांच्या निधनाचा धक्का त्यांना पचत नव्हता. ते स्वत:ला खूप एकटे समजायचे. पण, अभिनयावर त्यांची नितांत श्रद्धा होती. ढाब्यावर काम करता करता ते नेहमी अभिनयचा विचार करायचे. विशेष असे की, यापूर्वी त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये कामे केली होती. पण, त्यांना फारसे यश न मिळाल्याने कदाचीत ढाब्यावर काम करताना त्यांना कुणी ओळखले नसावे. कधी कधी ते स्वत:ही त्यांची ओळख लपवत असत. ढाब्यावर ते भाज्या आणि आॅमलेट बनवत. 

Image result for sanjay mishra

दरम्यान, नियतीने संजय मिश्रा यांच्या बाजूने कौल दिला. रोहित शेट्टी हे ‘आॅल द बेस्ट’ चित्रपटासाठी काम करत होते. त्यांना चांगल्या कलाकाराची आवश्यकता होती. कलाकारांबाबत विचार करताना अचानक त्यांना संजय मिश्रा यांची आठवण आली. रोहित शेट्टींनी ‘गोलमाल’मध्ये संजयचे काम पाहिले होते. तसेच, एकत्र कामही केले होते. त्यांनी संजयचा शोध घेतला. तसेच, संजयला चित्रपटाबाबतही सांगितले. 
 पण, आता परत चित्रपटसृष्टीत जायचे नाही हा निर्धार केलेल्या संजयनी रोहितची आॅफर नाकारली. रोहितनेही संजयच्या नकाराचे कारण शोधून त्यांचे मनपरिवर्तन केले. अखेर संजय पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी तयार झाले. त्यांचा अभिनय आणि चित्रपटसृष्टीत परतण्याचा निर्णय आयुष्याला कलाटनी देऊन गेला. चित्रपटसृष्टीत परतल्यावर संजयने कधीच मागे वळून पाहिले नाही. 
आजघडीला संजय मिश्रा हे कोट्यधीश अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीच्या फॉर्च्यूनर आणि बीएमडब्लू गाड्या आहेत. पाटणा आणि मुंबईत त्यांची घरे आहेत. इतकेच नव्हे तर, ते तब्बल तीन मिलियन म्हणजेच २० कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालकही आहेत. त्यांनी हे सर्व कमावले आहे ते चित्रपटसृष्टीतूनच. विशेष म्हणजे चित्रपटसृष्टीत कमबॅक केल्यानंतरची ही त्यांची सर्व कमाई आहे. 
सन १९९१ मध्ये संजय मिश्रा मुंबईत आले. चित्रपटसृष्टीत त्यांनी तब्बल ९ वर्षे स्ट्रगल केला. त्यानंतर कुठे त्यांना पहिली संधी मिळील.  ‘चाणक्य’ या मालिकेतून त्यांनी अभिनयाला सुरूवात केली. पण, पहिल्याच दिवशी त्यांना २८ वेळा रिटेक घ्यावे लागले. त्यानंतर ते अनेक चित्रपट मालिका यात मिळेल ते काम करू लागले. तिग्मांशु धुलियाच्या ‘हम बम्बई नहीं जाएंगे’ मध्ये कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले.

Related image

संजय मिश्रा यांचा ‘गेस्ट इन लंडन’ हा चित्रपट याच आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ओह डार्लिंग ये है इंडिया’ या १९९५ साली आलेल्या चित्रपटात संजय यांनी हार्मोनिअम प्लेयरची छोटीशी भूमिका साकारली होती. ‘सत्या’, ‘दिल से’, ‘फंस गए रे ओबामा’, ‘मिस टनकपुर हाजिर हो’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘मेरठिया गँगस्टर्स’ आणि ‘दम लगाके हायेशा’ हे त्यांचे काही विशेष दखलपात्र सिनेमे. तर, ‘मसाण’ चित्रपटात त्यांनी साकारलेली पित्याची भूमिकेचे विशेष कौतूक झाले. यंदा जवळपास सात ते आठ चिंत्रपटांच्या माध्यमातून ते प्रेक्षक आणि चाहत्यांच्या भेटीला येत आहेत.
कठोर परिश्रम आणि स्वत:वरचा नितांत विश्वास याच्या जोरावर ते स्वप्न पहात राहिले. त्यांची जिद्द आणि चिकाटी पाहून नियतीनेही त्यांच्याबाजूने कौल दिला. आज ते यशस्वी अभिनेते तर आहेतच. पण, श्रीमंतांच्या यादीतही त्यांचे नाव मानाने घेतले जाते.

Source : india.com

Web Title: OMG: Actor who was working on the dhaba, is now a crorepati!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.