OMG ! अॅक्टर्स-डायरेक्टर्सचा 'या' कारणाने झाला आमना-सामना !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 6:54 AM
-रवींद्र मोरे बॉलिवूडमध्ये एका अॅक्टरला स्टार बनविण्यामागे डायरेक्टरचा सर्वात मोठा सहभाग असतो. त्यामुळेच एक कलाकार सुपरस्टार बनल्यानंतरही आपल्या डायरेक्टरच्या ...
-रवींद्र मोरे बॉलिवूडमध्ये एका अॅक्टरला स्टार बनविण्यामागे डायरेक्टरचा सर्वात मोठा सहभाग असतो. त्यामुळेच एक कलाकार सुपरस्टार बनल्यानंतरही आपल्या डायरेक्टरच्या सर्व सुचना फॉलो करतो. मात्र काही वेळेस स्टार हे सर्व विसरुन चित्रपटावरुन किंवा अन्य कारणाने डायरेक्टरसोबत वाद घालतो आणि त्याच्याशी सर्व संबंध तोडतो. आज अशाच अॅक्टर-डायरेक्टरबाबत जाणून घेऊया ज्यांचा आमना-सामना चर्चेचा विषय ठरला होता. * सलमान खान - सुभाष घई बॉलिवूडचे शोमॅन म्हणून प्रसिद्ध असेलेले डायरेक्टर सुभाष घई आणि सलमान खानचा वाद बऱ्याच काळापासून आहे. एकदा स्वत: सलमान खानने सांगितले होते की, त्याने सुभाष घर्इंवर हात उगारला होता. हे प्रकरण एका चित्रपटाच्या बाबतीत उफाळलेल्या वादानंतरचे होते. मात्र या प्रकरणानंतर सलमानने दुसऱ्या दिवशीच माफी मागितली होती. * गोविंदा आणि नीरज वोरा गोविंदा आणि दिग्दर्शक नीरज वोरा यांचे थापड प्रकरण बराच काळ चर्चेत राहिले होते. गोविंदाने 'रण भोला रण' चित्रपटाच्या सेटवर नीरज वोरा यांना जोरात थापड लगावली होती. या मागचे कारण असे सांगण्यात आले होते की, गोविंदा चित्रपटाच्या एका सीनची शूटिंग करत होता. या सीनमध्ये त्याला आर्यन वैद द्वारा मार खायायचा होता, मात्र आर्यन वैद आपल्या भूमिकेत एवढा शिरला होता की, त्याने खरोखरच गोविंदाला थापड मारली. या गोष्टीने गोविंदा नाराज होऊन आपला सर्व संताप डायरेक्टर नीरज वोराला थापड मारुन व्यक्त केला. * सलमान खान आणि संजय लीला भंसालीदिग्दर्शक संजय लीला भंसाली यांनी सलमान खानचा सुपरहिट चित्रपट 'हम दिल दे चुके सनम' डायरेक्ट केला होता. दोघांचे संबंध तसे खूपच छान होते, मात्र संजय लीला भंसाली यांचा चित्रपट 'गुजारिश'च्या वेळी सलमान खान 'हा चित्रपट माशादेखील पाहायला जाणार नाहीत...' असे बोलून एकप्रकारे त्यांचा अपमान केला होता. सलमानच्या या वक्तव्यावरुन दोघांत वाद उफाळून बराच चर्चिलाही गेला होता. * डेविड धवन आणि गोविंदा डेविड धवन आणि गोविंदा या दोघांनी एकत्रित बरेच चित्रपट केले आहेत. डेविड आणि गोविंदा हे जणू समिकरणच होते. मात्र या दोघांत वाद तेव्हा निर्माण झाला जेव्हा गोविंदाने डेविड यांच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. गोविंदाच्या म्हणण्यानुसार डेविडने त्याला त्याच्या वाईट काळात मदत केली नव्हती, शिवाय डेविडदेखील आता त्याच्यासोबत काम करु इच्छित नाही, असेदेखील गोविंदा वाटू लागले होते.