Join us

​OMG!! अंकिता लोखंडे म्हणते, मीच ‘मणिकर्णिका’ची हिरोईन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 9:32 AM

टीव्ही जगतात नाव कमवल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. होय, कंगना राणौत स्टारर ‘मणिकर्णिका : द ...

टीव्ही जगतात नाव कमवल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. होय, कंगना राणौत स्टारर ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटातून अंकिता बॉलिवूड डेब्यू करतेय. या चित्रपटात कंगना राणौत  राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसणार आहे, हे तुम्ही जाणताच. अंकिताचे म्हणाल तर ती यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. पण आता या चित्रपटाची हिरोईन कंगना नसून मीच आहे, असे अंकिता सर्वांना सांगत सुटली आहे. अर्थात अंकिताबद्दल खूप मोठा गैरसमज करण्यासाठी तुम्ही तिचे सविस्तर म्हणणे वाचायला हवे.अलीकडे एका इव्हेंटमध्ये अंकिताला कंगनाबद्दल विचारले गेले. यावर अंकिताने कंगना अतिशय प्रोफेशनल असल्याचे सांगितले. ‘कंगना सेटवर अतिशय प्रोफेशनल असते. ती या चित्रपटाची हिरो आहे आणि मला ती तिची हिरोईन  म्हणून लॉन्च करते आहे. कुणाला लॉन्च करणे कठीण नाही. पण योग्य व्यासपीठ देणे गरजेचे आहे. जे मला मिळालेय. मी या चित्रपटात झलकारी बाईची भूमिका साकारते आहे आणि हा या चित्रपटाचा सर्वांत सुंदर भाग आहे. मी माझ्या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतलीय,’ असे अंकिता म्हणाली. एकंदर काय तर अंकिताने कंगनाची बरीच प्रशंसा केली आहे. ALSO READ : ‘मणिकर्णिका’मध्ये ‘या’ अभिनेत्याशी रोमान्स करणार अंकिता लोखंडे!या इव्हेंटमध्ये आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अंकिताने सांगितले की, ‘मला आधी झलकारी बाईबद्दल काहीही ठाऊक नव्हते. पण झलकारी बाई आपल्या इतिहासातील एक महान लढाऊ महिला आहे. मी नशीबवान आहे की, मला तिची कथा लोकांना सांगण्याची संधी मिळतेय.’ सामान्य कुटुंबात जन्मलेल्या झलकारीबाईने आपल्या शौर्याने आणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते.   इंग्रज सेनानी ह्यू रोज याच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर निकराचा हल्ला केला असता, झलकारीबाईच्या सल्ल््यानुसार राणीने झाशीचा किल्ला रात्रीच्या अंधारात सोडला. यादरम्यान झलकारीबाई यांनी राणीप्रमाणे वेश धारण करून ह्यू रोजच्या सैन्याशी युद्ध केले. पण ते नाटक इंग्रज सैनिकांना समजले. त्यांनी झलकारीबाईला पकडले व फासावर लटकवले होते.